स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४ या लोकप्रिय (Superstar)कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. महाराष्ट्रभरातून निवडलेल्या सहा गुणी स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीत जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. या अंतिम लढतीत कोल्हापूरची शुभ्रा खाडे हिने आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकत विजेतेपद पटकावले. तिला तीन लाख रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.दुसऱ्या क्रमांकावर नांदेडची वीरा हाक्के हिने आपली छाप सोडली. तर तृतीय क्रमांक नाशिकची अस्मिता गादेकर आणि ठाण्याचा अर्णव बोपलकर यांना विभागून देण्यात आला

याशिवाय पुण्याची ईशानी हिंगे आणि गंधर्व चामनर यांना उत्तेजनार्थ (Superstar) बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.विजेतेपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना शुभ्रा खाडे म्हणाली की, ‘हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी स्पर्धेत भाग घेऊ शकले. या मंचाने फक्त गाणंच नाही तर मला आत्मविश्वासही दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत सर यांचे विशेष आभार.
पुढे शुभ्रा म्हणाली, इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे.(Superstar) या मंचाने सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. स्टार प्रवाहने मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या रुपात नव्या पाढीसाठी हा मंच खुला करुन दिला आहे त्यांची देखिल मी ऋणी आहे.’
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?