आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

अनेकांना आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा त्यात काही बदल (number) करण्यासाठी मोबाईल नंबरवर येणाऱ्या ओटीची गरज लागायची. अनेकांना यामध्ये उशीरा OTP यायचा किंवा अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागायचं. आता टेन्शन सोडा. कारण नवीन अपडेटमध्ये मोबाईल नंबर लिंक नसला तरीही तुमचं काम थांबणार नाही. तुम्हाला यामध्ये या पुराव्याची गरज भासणार नाही.आता आधारच्या नियमात बदल झाला आहे. त्यामध्ये UIDAI ने Face Authentication सारखी नवी सुविधा सुरू केलीये. त्याच्या मदतीने तुम्ही OTP शिवायही ओळख पडताळणी करु शकता. यामुळे आता Aadhaar PVC कार्ड थेट घरी मागवू शकता.

त्यासाठी UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन Order Aadhaar PVC Card या (number)पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर Aadhaar नंबर किंवा VID टाकून आवश्यक माहिती भरायची आणि पेमेंट करायचं आहे. ही साधी सोपी प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागेल.

Face Authentication करण्याची ही खूप प्रोसेस सोपी आहे. मोबाईल किंवा(number) अ‍ॅपमध्ये कॅमेरा सुरू करून तुमचा चेहरा स्कॅन केला जातो आणि तो Aadhaar डेटाशी जुळवला जातो. यामुळे OTPची तुम्हाला लागणार नाही. तुम्ही आधार कार्ड हे Download Aadhaar या अॅपमधून करु शकता. त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळेल. त्याचा पासर्वड हा तुमच्या नावाची पहिली ४ अक्षरे आणि जन्माचे साल असे असेल.UIDAI ने आधार युजर्ससाठी हा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत आधार कार्ड डाउनलोड किंवा अपडेट करण्याठी तिथे otp नंबर देणं अनिवार्य होतं. त्यामुळे ज्यांचा ज्या व्यक्तींचा मोबाईल नंबर लिंक नाही, त्यांना अडचणींना सामोरं जावं लागत होतं. आता हे टेन्शन अखेर संपलं आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

 गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल