आधार कार्ड आजच्या घडीला प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक आहे.(update) सरकारी योजना, बँकिंग सेवा, मोबाईल सिम कार्ड घेणे अशा अनेक कामांसाठी आधारची गरज भासते. त्यामुळे आधारवरील नाव, पत्ता, मोबाईल नंबर किंवा जन्मतारीख यामध्ये काही चूक असल्यास ती तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे ठरते. याबाबत आधारची नियामक संस्था UIDAI ने अद्ययावत शुल्काबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.UIDAI च्या माहितीनुसार, आधारमधील डेमोग्राफिक माहिती म्हणजेच नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा जन्मतारीख अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्रात आता ७५ रुपये आकारले जातील. हे शुल्क प्रत्येक अपडेटसाठी वेगळे असते. त्यामुळे, वारंवार छोटे बदल करण्याऐवजी एकाच वेळी सर्व आवश्यक बदल करून घेणे अधिक फायदेशीर ठरते.

याशिवाय, आधारमधील बायोमेट्रिक माहिती जसे की बोटांचे ठसे,(update) डोळ्यांची बाहुली आयरिस किंवा फोटो अपडेट करण्यासाठी १२५ रुपये आकारले जातील. विशेषतः मुलांचे वय वाढत असताना किंवा जुन्या बायोमेट्रिक माहितीमुळे अडचणी येत असल्यास हे अपडेट करणे आवश्यक ठरते. ५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी काही कालावधीपर्यंत हे अपडेट मोफत असते, मात्र त्यानंतर शुल्क लागू होते.एक दिलासादायक बाब म्हणजे, myAadhaar पोर्टलद्वारे कागदपत्रे अपडेट करण्याची सुविधा सध्या मोफत उपलब्ध आहे.
ही सवलत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू आहे. त्यामुळे, ऑनलाइन पद्धतीचा वापर (update) करून नागरिक आपले पैसे वाचवू शकतात. ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करण्यासाठी ऑनलाइन पर्याय अधिक सोयीस्कर आणि जलद ठरतो.तसेच, UIDAI ने नागरिकांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे की, नेहमी अधिकृत वेबसाइट, ॲप किंवा आधार सेवा केंद्राचाच वापर करावा. एजंट किंवा अनोळखी व्यक्तींमार्फत आधार अपडेट करताना फसवणुकीचा धोका असू शकतो. एकूणच, आधार माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. योग्य पद्धतीने आणि अधिकृत माध्यमातून अपडेट केल्यास वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकतात.
हेही वाचा
उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट
कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा