इचलकरंजी शहरातील(city) मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खडडे पडले असुन सदरच्या रस्त्यांवर शालेय विदयार्थी, यंत्रमाग कारखान्याची वाहतुक या रस्त्याने होत असते. सदरचे शहरातील अनेक रस्ते विविध निधीतुन मंजुर आहेत.

वॉर्ड नं. १३ मधील व्हधडी किरणा, लिंबु चौक होसकल्ले हॉस्पिटल, चांदणी चौक थोरात चौक ते विक्रम नगर महासत्ता चौक ते थोरात चौक गांधी कॅम्प, वेताळ पेठ होळी कटटा ते गांधी पुतळा नारायण पेठ,वखार भाग मोठे तळे परिसर, तिन बत्ती ते पंचवटी टॉकीज संग्राम चौक ते घोडके नगर गोकुळ चौक कागवाडे मळा श्री संत नामदेव मैदान परिसर

सध्यस्थितीत पावसाळयाचे दिवस सुरु झाले असलेने सदर रस्ता होणेस विलंब होणेची शक्यता असून सदर रस्त्यावर अपघात होणेचे प्रमाण वाढले असुन जीवितहानी होणेच्या अगोदर सदर रस्त्यावरील असणारे खडडंयाचे चांगल्या दर्जाचे पॅचवर्क तात्काळ करणेत यावे अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त तथा प्रशासकसो, पल्लवी पाटील इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी(city) यांचेकडे निवेदना व्दारे केली आहे.
हेही वाचा :
सावधान! महाराष्ट्रात ‘या’ 11 जिल्ह्यांना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका
धक्कादायक! अडीच हजार सरकारी महिला कर्मचारी निघाल्या लाडक्या बहिणी
सोन्याच्या दरात पुन्हा झाली घसरण, चांदीच्या किंमतही नरमल्या!