गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला मुसळधार पावसामुळे(rains) मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूरस्थिती चिंताजनक आहे. एनडीआरएफ बचावकार्य करत आहे. शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये(rains) मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे सर्वत्र पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. राज्यातील पूर आलेल्या अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना एनडीआरएफच्या पथकांकडून सुरक्षित बाहेर काढले जात आहे.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर

बीड जिल्ह्याला गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या आणि धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. रात्री झालेल्या पावसामुळे बिंदूसरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. ज्यामुळे बीड शहरातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच बीड तालुक्यातील नांदुर हवेली गावात सिंदफणा नदीच्या पुरात 36 लोक अडकल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती मिळताच रात्री पुण्यातून एनडीआरएफचे पथक दाखल झाले. या पथकाने केलेल्या बचावकार्यात 18 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जालना जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान

जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि अंबड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुखना नदी चौथ्यांदा दुथडी भरून वाहत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला होता. यामुळे अनेक प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मात्र, शेतीत पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे गल्हाटी नदीच्या पुराचे पाणी गावात शिरले. ज्यामुळे घरे आणि दुकानांमध्ये पाणी घुसले. याशिवाय, अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील शाळेच्या प्रांगणाला तळ्याचे स्वरूप आले आहे.

धाराशिव जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भूम, परंडा आणि कळंब तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे नद्यांना पूर आला असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 65 लोकांना काल सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या सीना नदीत दोन लाख क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूरमधील गावांमध्ये पाणी शिरले असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे.

लातूर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे 20 रस्ते बंद

लातूर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील 20 हून अधिक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मांजरा, तावरजा आणि तेरणा नद्यांना पूर आला असून, अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. लातूर जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण वाहून गेला. लातूर जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प 100 टक्क्यांहून अधिक भरले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

चिपळूण येथील मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सततच्या पावसामुळे रस्ता खचला आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. आधीच एक मार्ग बंद असल्याने उर्वरित एकाच मार्गावरून वाहतूक सुरू आहे, ज्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा :

90 टक्के लोकांना माहिती नाहीत, क्रेडिट कार्डशी संबंधित ‘या’ गोष्टी 
झोपण्यापूर्वी फक्त लावा कोरफड, चेहऱ्यामध्ये होतील चमत्कारिक बदल,
टीम इंडिया भिडणार बांगलादेशसोबत, हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड?