सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघाला की अनेकजण बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला अधिकचे प्राधान्य दाखवतात. पण या वर्षात बँकांच्या एफडीवरील व्याजदरात मोठी कपात करण्यात आली असल्याने पोस्ट ऑफिसच्या(Post Office) बचत योजना गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरत आहेत.अशा स्थितीत जर तुम्हाला पोस्टाच्या एखाद्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आजचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती बघणार आहोत, ज्याच्या मदतीने गुंतवणूकदार पैसे दुप्पट करू शकतात.

पोस्ट ऑफिस(Post Office) कडून सुरू करण्यात आलेली टाईम डिपॉझिट योजना गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरते. या योजनेला एफ डी योजना म्हणूनही ओळखले जाते. ही योजना 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष आणि 5 वर्ष कालावधीची आहे. यातील एका वर्षाच्या योजनेत गुंतवणूकदारांना 6.9% दराने व्याज मिळते. दोन वर्षांसाठी सात टक्के, तीन वर्षांसाठी 7.10% व्याज मिळते.तसेच पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.50% व्याज मिळते. दरम्यान जर तुम्हाला या योजनेतून तुमचा पैसा दुप्पट करायचा असेल तर तुम्हाला दहा वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार हे महत्वाचे.

पोस्ट ऑफिसच्या(Post Office) पाच वर्षांच्या बचत योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला पुन्हा एकदा ती गुंतवणूक पाच वर्षांसाठी वाढवावी लागणार आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिस योजनेत 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुमचे पैसे 10 वर्षांत 7.5% व्याजदरानुसार डबल होणार आहेत.लक्षात ठेवा की, या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज दर 4 महिन्यांनी मोजले जाते. यामुळे जर व्याजदरात बदल झाला तर साहजिकच यातून मिळणाऱ्या परताव्याची रक्कम सुद्धा बदलणार आहे. जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 10 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले तर त्या गुंतवणूकदाराला 10 लाख 51 हजार 175 रुपये मिळणार आहेत. अर्थात 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 लाख 51 हजार 175 रुपये व्याज मिळणार आहे.

हेही वाचा :

आई अन् मुलीचा बाथरूममधील प्रायव्हेट VIDEO शूट, व्हायरल करत….
बस स्टँडवर प्रेमी युगलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स Video Viral
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी….