ऑक्टोबर महिना हा केंद्रीय सरकारी कर्मचारी(employees) आणि पेन्शन धारकांसाठी खास ठरणार आहे. दिवाळीपूर्वी सरकारकडून महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा होण्याची शक्यता होती. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनच्या रचणेत सुधार करण्यासाठी 7th pay commission बसवण्यात आली होती. त्याच्या अंतर्गत मार्च महिन्यात मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला होता आणि त्यानुसार भत्ता 55% झाला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली होती.

जानेवारी ते जून 2025 पर्यंतचा महागाई भत्त्याची वाढ All India consumer price index च्या आकडेवारीच्या आधारावर ठरवली जाणार आहे. आता जुलैपासून लागू झालेल्या वाढीमुळे भत्ता 58% एवढा होण्याची शक्यता आहे. त्याची सुद्धा आकडेवारी तयार केली जात आहे. ही आकडेवारी लवकरच केंद्रीय मंडळासमोर सादर करण्यात येणार आहे.

महागाई भत्त्यात झालेल्या या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना (employees)मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने त्या आधीच भात्त्याचा अधिकृत निर्णय दिवाळी पूर्वीच घेतला जाणार आहे.ही वाढ जुलैपासून लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकची रक्कम सुद्धा मिळणार आहे. अश्यातच सरकार ने GST चे दर कमी केले आहेत आणि आता भत्ता वाढ होणार असल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. याचा जनतेला फायदा तर होणारच आहे, पण त्याचसोबत या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने सणासुदीला बाजारपेठेत उलाढाल वेग घेण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी…
भारताविरुद्धच्या मॅचनंतर पाकिस्तानने गावावर टाकले 8 बॉम्ब 30 जणांचा मृत्यू
सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर!