उत्तर प्रदेशातील लखनऊमधील चिनहट परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने महिला आणि तिच्या मुलींचा बाथरूममधील खाजगी(private) व्हिडिओ शूट करून तो मित्रमंडळीत शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शरीफ हा वारंवार महिलांना अश्लील कमेंट करायचा. एवढंच नव्हे तर तो टेरेसवर नग्न अवस्थेत फिरून पीडितेला त्रास देत होता. एका दिवशी त्याने महिला आणि तिच्या मुलींचे बाथरूममध्ये अंडरगारमेंट वाळत घालत असतानाचे व्हिडिओ चोरून रेकॉर्ड केले आणि ते मित्रांमध्ये पसरवले.

पीडित महिलेने याला विरोध केला असता, आरोपीने थेट तिच्या घरात घुसून कुटुंबाला मारहाण केली. इतकंच नव्हे तर परिसरातील अनेक ठिकाणी त्याने गुप्त कॅमेरे बसवले असल्याचेही समोर आले आहे(private). स्थानिक तरुणींनी याचा विरोध केला असता, आरोपी त्यांच्यावर हल्ला करत असे.

या धक्कादायक प्रकारामुळे पीडित महिला आणि तिच्या मुलींनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा :

बस स्टँडवर प्रेमी युगलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स Video Viral
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी….
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी…