खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळं अल्पवयीन विद्यार्थिनीचा(girl) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकच भक्षक झाल्याने पालकांनाही धक्का बसला आहे.

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी परिसरातील ही घटना आहे. येथील शिक्षकी पेशातल्या नराधमाने शिकवणी वर्गातच अल्पवयीन विद्यार्थिनीवर(girl) अत्याचार करून तिचा बळी घेतला आहे. संदेश गुंडेकर असे या शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून या नराधमाला अटक केली आहे.

गेल्या वर्षभरापासून हा शिक्षक शिकवणी वर्गातच तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करीत होता. यात तिला गर्भधारणा झाली. विद्यार्थिनीला गर्भधारणा झाल्यानंतर शिक्षक घाबरला. ही गोष्ट बाहेर कोणाला समजल्यास आपलं बिंग फुटेल या भीतीने आरोपीने घरात तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थिनीचा(girl) गर्भपात करण्यासाठी संदेश गुंडेकरने विद्यार्थीनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. मात्र या गोळ्यांमुळं तिची प्रकृती बिघडली. तेव्हा तिला पुसद येथील रुग्णालयात नेले असता अवैध गर्भपाताचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर विद्यार्थिनीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला.

खासगी शिक्षकाच्या विकृतीची विद्यार्थिनी शिकार ठरल्याने समाजमन्न सुन्न झाले आहे. संतप्त नागरिकांनी आज ढाणकी बंद ठेवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी व सदरचे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे अशी मागणी केली आहे. या घटनेने पालकांनाही मोठा धक्का बसला आहे.

यवतमाळच्या महागाव तालुक्यातील घोन्सारा गावात धाकट्या मुलाने आई वडिलांवर जेवणातून विषप्रयोग करून त्यांची हत्या केल्याचा आरोप मोठ्या मुलाने केला आहे. मयत शेतकरी शेषराव राठोड त्याची पत्नी विमल राठोड यांना जेवणानंतर छातीत त्रास होऊ लागला, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. रक्त तपासणी अहवालात त्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय. धाकटा मुलगा भीमदेव हा जुगारात पैसे हरल्यामुळे त्याने हा विष प्रयोग केल्याची तक्रार थोरला भाऊ नामदेव यांने केली आहे. दरम्यान पोलिसांनी त्या दृष्टीने तपास हाती घेतला आहे.

हेही वाचा :

बस स्टँडवर प्रेमी युगलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स Video Viral
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी….
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी…