कोरफड ही फारच गुणकारी आहे. तिचा योग्य उपयोग(face) केल्यास तुमच्या चेहऱ्यावर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफड लावली तर तुम्हाला त्याचे फायदे दिसतील.

कोरफड अनेक अर्थांणी गुणकारी आहे. अनेक (face) सौंदर्य प्रसाधनांत कोरफडीचा उपयोग केला जातो. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा योग्य पद्धतीने वापर केल्यास तुम्हाला खूप सारे फायदे होऊ शकतात. चेहरा सुंदर होऊ शकतो. कोरफडीचा वापर कसा करता येईल ते जाणून घेऊ या…

रोज रात्री कोरडफ चेहऱ्यावर लावून झोपल्यास तुमच्या त्वचेला अनेक अर्थांनी फायदा होतो. कोरफडीमध्ये ए, सी, ई जीवनसत्त्वे असतात. कोरफड ही अँटी बॅक्टेरियल आणि अॅटी इन्फ्लेमेंटरी असते. त्यामुळे कोरफड चेहऱ्याला लावल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफड चेहऱ्याला लावल्यास पिंपल्स कमी होण्यास मदत होते. कोरफड अँटी-बॅक्टेरियल असल्यामुळे पिंपल्स मोठे होत नाहीत. पिंपल्स लगेच सुकून जातात आणि कालांतराने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.

तुम्हाला तुमचा चेहरा तजेलदार असावा असे वाटत असेल तर रोज रात्री झोपताना चेहऱ्याला कोरफड आवर्जुन लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होण्यास मदत होते. चेहरा तजेलदार होतो. तसेच चेहऱ्यावर तेज येते.

तुमच्या चेहऱ्याची आग होत असेल तरेच उन्हाचा त्रास होत असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला, चेहऱ्याला कोरफड लावावी. यामुळे तुमच्या चेहऱ्याची आग कमी होण्यास मदत होईल. तेसच चेहरा मुलायमही होईल.

हेही वाचा :

संसर्गजन्य आजारांपासून कायमची मिळेल सुटका! 
नवरात्रीचा दुसरा दिवस राशींसाठी भाग्यशाली! आर्थिक लाभाचे मोठे संकेत,
Maruti Fronx की Hyundai Venue, आजपासून कोणती कार झाली जास्त स्वस्त?