जीएसटी कमी झाल्याने अनेक कारच्या किमती कमी(prices) झाल्या आहेत. अशातच चला जाणून घेऊयात की Maruti Fronx जास्त स्वस्त झाली की Hyundai Venue?

पूर्वी कार खरेदी करताना आपल्याला 28 टक्के टॅक्स द्यावा लागत होता. मात्र, आता नवीन जीएसटी दरानुसार कारवर 18 टक्के जीएसटी लागू झाला आहे. हे दर आज म्हणजेच 22 (prices) सप्टेंबर 2025 पासून नवे जीएसटी स्लॅब लागू झाले आहेत. यामुळे मारुती सुझुकीपासून ते ह्युंदाईपर्यंतच्या अनेक कार आता स्वस्त झाल्या आहेत. नव्या जीएसटी रिफॉर्म्सनुसार, 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या 1200 सीसीपेक्षा कमी पेट्रोल कार आणि 1500 सीसीपेक्षा कमी डिझेल कार यांच्यावर आता 18% जीएसटी आकारला जाणार आहे.

याआधी या वाहनांवर 28% जीएसटी लागू होत होता. तर लक्झरी कार्सवर केवळ 40% जीएसटी लागू होईल आणि कोणताही सेस आकारला जाणार नाही. याआधी लक्झरी कार्सवर 28% जीएसटी आणि 22% सेस आकारला जात होता. त्यामुळे जर तुम्ही Maruti Fronx किंवा Hyundai Venue घेण्याचा विचार करत असाल, तर कोणती कार अधिक स्वस्त होणार आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

कोणती कार होणार स्वस्त?

Maruti Suzuki ने आपली लोकप्रिय SUV Fronxच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. GST 2.0 लागू झाल्यानंतर कंपनीने तिच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमतींमध्ये सरासरी 9.27% ते 9.46% इतकी घट केली आहे. ग्राहकांना याचा थेट फायदा होत असून आता Fronx वर जास्तीत जास्त ₹1.11 लाखांची बचत करता येणार आहे. हा बदल आजपासून लागू झाला आहे.

Hyundai Venue आणि Creta झाल्या स्वस्त

Hyundai Venueलाही जीएसटी कपातीचा मोठा फायदा झाला आहे. याआधी पेट्रोल इंजिनवर 29% आणि डिझेलवर 31% टॅक्स आकारला जात होता. आता दोन्हीही इंजिन्स 18% जीएसटी स्लॅबमध्ये आले आहेत. त्यामुळे Venue ची किंमत ₹68,000 ते ₹1.32 लाखांपर्यंत कमी झाली आहे. नव्या किंमतीनुसार Venue आता ₹7.26 लाख ते ₹12.05 लाख इतक्या दरम्यान उपलब्ध आहे.

याशिवाय, ह्युंदाई क्रेटाची सुरुवातीची किंमत आता ₹10.73 लाख झाली आहे . तसेच, Hyundai Grand i10 आता ₹51,000 ने स्वस्त झाली असून तिची सुरुवातीची किंमत फक्त ₹5.47 लाख झाली आहे. पूर्वी ही कार ₹5.99 लाख दराने मिळत होती.

हेही वाचा :

आई अन् मुलीचा बाथरूममधील प्रायव्हेट VIDEO शूट, व्हायरल करत….
बस स्टँडवर प्रेमी युगलाचा खुल्लम खुल्ला रोमान्स Video Viral
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी….