टाटा मोटर्सकडून Ace रेंजमध्ये अजून एका वाहनाचा(price) डिझेल व्हेरिएंट ‘ऐस गोल्‍ड+’ लाँच केला आहे. हे नवीन वाहन 5.52 लाख रुपयात लाँच करण्यात आले आहे.

भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन(price) निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आज त्यांच्या प्रतिष्ठित ऐस श्रेणीतील सर्वात किफायतशीर डिझेल व्हेरिएंट ‘ऐस गोल्ड+’ सादर केला. फक्त ₹5.52 लाख किंमत असलेला हा मिनी-ट्रक उत्तम परफॉर्मन्स आणि आपल्या श्रेणीत सर्वात कमी टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप प्रदान करतो. त्यामुळे तो आजच्या मूल्य-जागरूक उद्योजकांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो.

प्रगत तंत्रज्ञान आणि कमी मेंटेनन्स खर्च
‘ऐस गोल्ड+’ मध्ये अत्याधुनिक लीन NOx ट्रॅप तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड ची आवश्यकता संपते. यामुळे देखभाल व कार्यसंचालन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. ही नाविन्यपूर्ण प्रणाली कठोर उत्सर्जन नियमांचे पालन सुनिश्चित करते, तर वारंवार होणारा खर्च कमी करून ग्राहकांची नफा क्षमता वाढवते.

लाँचवेळी प्रतिक्रिया देताना, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्सचे एससीव्हीपीयूचे उपाध्यक्ष व व्यवसायप्रमुख पिनाकी हल्दर म्हणाले, “दोन दशकांपूर्वी लाँच झाल्यापासून टाटा ऐस ने भारतात लास्ट-माईल गतीशीलतेत क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत आणि लाखो उद्योजकांना प्रगतीस सक्षम केले आहे. प्रत्येक अपग्रेडसह या मिनी-ट्रकमध्ये प्रगत तंत्रज्ञान, उपयुक्त वैशिष्ट्ये आणि वैविध्यपूर्ण उपयोगिता समाविष्ट करण्यात आली आहे.

उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि पेलोड क्षमता
‘ऐस गोल्ड+’ मध्ये टर्बोचार्ज्ड Dicor इंजिन असून ते 22 PS पॉवर आणि 55 Nm टॉर्क निर्माण करते. हा मिनी-ट्रक विविध व्यवसाय उपयोजनांमध्ये विश्वासार्ह ठरेल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे. 900 किलो पेलोड क्षमता आणि विविध लोड डेक कॉन्फिगरेशन सोबत तो कार्गो गरजांसाठी कार्यक्षम व बहुपयोगी ठरतो.

विस्तृत पोर्टफोलिओ आणि सेवा सुविधा
टाटा मोटर्सच्या स्मॉल कमर्शियल व्हेईकल आणि पिकअप पोर्टफोलिओमध्ये ऐस प्रो, ऐस, इंट्रा आणि योधा यांचा समावेश आहे. हे वाहन 750 किलो ते 2 टन पेलोड क्षमतेत उपलब्ध असून डिझेल, पेट्रोल, सीएनजी, बाय-फ्युएल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पर्याय देतात. या श्रेणीला पूरक म्हणून कंपनीचा संपूर्ण सेवा 2.0 लाइफसायकल सपोर्ट प्रोग्राम उपलब्ध आहे, ज्यात AMC पॅकेजेस, जेन्युइन स्पेअर पार्ट्स आणि 24×7 रोडसाइड असिस्टन्स यांचा समावेश आहे.

टाटा मोटर्सचे मजबूत नेटवर्क
देशभरातील 2,500 आऊटलेट्स, व्यापक स्पेअर्स व सर्विस नेटवर्क, तसेच प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या ‘स्टार गुरू’ परिसंस्थाच्या सहाय्याने, टाटा मोटर्सचा ‘ऐस गोल्ड+’ उद्योजकता विकास आणि कार्गो गतीशीलतेसाठी योग्य ठरतो.

हेही वाचा :

टीम इंडियाचा सलग तिसरा विजय,
अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे?
RBI कडून डेबिट कार्ड, लेट पेमेंट आणि मिनिमम बॅलेन्सबाबत मोठे बदल,