अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थीचे व्रत 25 सप्टेंबर (Chaturthi)रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी बाप्पाची पूजा केल्याने यश, ज्ञान, संपत्ती, आनंद आणि समृद्धी मिळते. यावेळी विनायक चतुर्थीच्या पूजेसाठी मुहूर्त काय आहे, जाणून घ्या

विनायक चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे.(Chaturthi) ज्योतिषशास्त्रानुसार अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी आहे. अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की विनायक चतुर्थीला बाप्पाची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व त्रासातून सुटका होते. या व्रताच्या वेळी संततीशी संबंधित प्रत्येक समस्या सोडवली जाते. कुटुंबाच्या वाढीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते.

विनायक चतुर्थी मुहूर्त
पंचांगानुसार, आश्विन शुक्ल चतुर्थी तिथीची सुरुवात गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी सकाळी 7.6 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9.33 वाजता संपेल. गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 11 ते दुपारी 1.25 पर्यंत असेल.

विनायक चतुर्थीच्या व्रताचे फायदे
विनायक चतुर्थीला वरदा विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते. कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी वरद हे देवाचे वरदान आहे. विनायक चतुर्थीचे व्रत करणाऱ्या भक्तांना भगवान गणेश बुद्धी आणि संयमाचे आशीर्वाद देतात. बुद्धी आणि संयम हे दोन नैतिक गुण आहेत ज्यांचे महत्त्व शतकानुशतके मानवजातीने ओळखले आहे. ज्या व्यक्तीकडे हे गुण असतात तो जीवनात खूप प्रगती करतो आणि इच्छित परिणाम साध्य करतो, असे देखील म्हटले जाते.

विनायक चतुर्थी पूजा पद्धत
सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करा. एका चौरंगावर पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र पसरवून त्यावर बाप्पाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर सिंदूर, तांदळाचे संपूर्ण धान्य, दुर्वा, लाल फुले, सुकामेवा आणि मोदक त्यांना अर्पण करा. नंतर ओम गं गणपतये नमः या मंत्रांचा जप करावा किंवा गणेश चालीसा, गणपती अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन स्तोत्राचा पाठ करा.

बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे
विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करुन बाप्पाची पूजा करावी. त्यानंतर बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा. त्यानंतर शुद्ध तूप आणि गूळ देखील अर्पण करा. नंतर वक्रतुंडय हम या मंत्रांचा जप करावा. असे करणे आर्थिक लाभासाठी फायदेशीर मानले जाते. यासोबतच गाईला तूप आणि गूळ खायला घाला आणि गरिबाला द्या. त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. हे उपाय सलग पाच दिवस करावे. असे केल्याने तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेची e-KYC कशी करायची? कोणती कागदपत्रं लागणार
‘सलमान दररोज रात्री ऐश्वर्याला…’, मी स्वत: पाहिलेलं ‘या’ अभिनेत्रीचा मोठा खुलासा
ट्रॅफिकने घेतला चिमुकल्याचा जीव! 5 तास Ambulance एकाच जागी