हृदय पिळवटून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक कोंडीमुळे(traffic) अनेक वेळा कामाच्या ठिकाणी उशिरा पोहोचणे, कधी कधी बस, ट्रेन किंवा विमान सुटणे, हे काही नवीन गोष्ट नाही. पण याच वाहतूक कोंडीचा शिकार एक दीड वर्ष चिमुकला झाला आहे. अहमदाबादमधून उपचारासाठी चिमुकला रुग्णवाहिनीतून आईसोबत निघाला खरा पण रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

नायगावच्या चिंचोटीमधील गॅलक्सी हॉस्पिटमध्ये उपचार घेत असलेल्या या चिमुकल्याला तातडीच्या उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठी डॉक्टराने सांगितलं. त्यामुळे चिमुकल्याचे जीव वाचविण्यासाठी त्याला रुग्णवाहिनीतून मुंबईकडे आई-वडील निघाले. पण मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडीमुळे उपचाराशिवायच त्या चिमुकल्याने जीव गमावला.

शुक्रवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर संध्याकाळी 20-25 किमीपर्यंत लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमध्ये त्या चिमुकल्याची रुग्णवाहिनी एकाच जागेवर 5 तास उभी होती. या भीषण वाहतूक कोंडीतून त्या रुग्णवाहिनीला जाण्यास जागा मिळाली नाही. या रुग्णवाहिनीत तो चिमुकला उपचारासाठी तडफडत होता. अचानक त्याच्या शरीराची हालचाल बंद झाली.

आईच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यांनी अर्थक प्रयत्नातून महामार्गावरील एका ससूनघर गावातील रुग्णालयाकडे रुग्णवाहिनी वळली. तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्या चिमुकल्याची तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केलं. हे ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील या वाहतूक कोंडीची (traffic)मोठी किंमत या कुटुंबियांना मोजावी लागली.

चिमुकल्याचा जीव वाचवायचा असेल तर अहमदबादमधील रुग्णालयातील डॉक्टराने मुंबईत उपचारासाठी घेऊ जा असं सांगितलं होतं. पण वाहतूक कोंडी रुग्णवाहिकेला मार्ग न मिळाल्यामुळे या आई वडिलांना त्यांच्या चिमुकल्याला गमवावं लागलं.दरम्यान जुलै महिन्यामध्येही मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडीचा फटका 49 वर्षीय छाया पुरव यांचा जीव गेला. पालघर जिल्ह्यातून निघालेली रुग्णवाहिनी हिंदूजा रुग्णालयात वेळत पोहोचली नाही म्हणून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अहमदाबादमधील नायगावच्या चिंचोटी येथील गॅलक्सी हॉस्पिटलमधील उपचार घेत असलेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याला (नाव उल्लेख नाही) मुंबईला उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णवाहिका निघाली. पण महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका ५ तास अडकली, आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना १९ सप्टेंबर २०२५ रोजी घडली.

चिमुकला नायगावच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. डॉक्टरांनी तातडीने मुंबईला (ससून रुग्णालय किंवा इतर) नेण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी सकाळी आई-वडिलांसोबत रुग्णवाहिकेत निघाल्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकली. २०-२५ किमी रांगा लागलेल्या कोंडीत रुग्णवाहिका ५ तास थांबली, आणि चिमुकल्याची हालचाल बंद झाली. जवळच्या ससूनघर गावातील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी २०-२५ किमीपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. मुख्य कारणे: दुरुस्ती कामे, खराब हवामान आणि वाहनांची गर्दी. रुग्णवाहिकेला मार्ग मिळाला नाही, आणि ती एकाच जागी ५ तास थांबली.

हेही वाचा :

काजोलने पुन्हा मोडला ‘तो’ नियम; ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ चर्चेत
4 सख्ख्या बहिणींवर बलात्कार; हादरवणारा घटनाक्रम समोर
6 खेळाडू गायब; team India मध्ये मोठ्या बदलाचे संकेत