लाडकी बहीण योजनेचे (Yojana)पैसे हवे असतील तर आता e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया करायची कशी, कुठे आणि कधीपर्यंत जाणून घ्या यासंदर्भातील 10 प्रश्नांची 10 उत्तरं..राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी दिली आहे. यापुढे ईकेव्हायसी असलेल्या महिलांनाच या योजनेअंतर्गत दीड हजार रुपये मिळणार आहेत. मात्र हा ईकेव्हायसी करायचा कसा? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागणार? त्यासाठी काही ठराविक कालावधी आहे का?

या योजनेत अपात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचे समोर आल्यानंतर पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी e-KYC बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळेल आणि भविष्यातील इतर शासकीय योजनांसाठीही उपयुक्त ठरेल. शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Yojana) पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य” असे पत्रक जारी केले आहे. सर्व लाभार्थी महिलांनी ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधेचा वापर करावा. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी आणि सुलभ आहे. पोर्टलवर आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरून Aadhaar Authentication करावे. यासाठी “परिशिष्ट- अ” मधील Flowchart चा संदर्भ घ्यावा.
परिपत्रकाच्या दिनांकापासून (सप्टेंबर 2025) पुढील 2 महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजेच नोव्हेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. जर पूर्ण केली नाही तर पुढील कार्यवाहीस (मासिक लाभ) पात्र राहिले जाणार नाही. माननीय मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार, दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत (जून ते ऑगस्ट) e-KYC करणे बंधनकारक राहील. हे पात्र लाभार्थींची वार्षिक पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी आवश्यक आहे.परिपत्रकात “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. हे आधार अधिनियम, 2016 च्या कलम 7 नुसार अधिसूचित करण्यात आले आहे.
जर लाभार्थींनी 2 महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण केली नाही तर ते पुढील कार्यवाहीस पात्र राहिले जाणार नाहीत. म्हणजेच मासिक दीड हजार रुपयांचा लाभ थांबू शकतो. तसेच, भविष्यातील इतर शासकीय योजनांसाठीही अडचणी येऊ शकतात. महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षांच्या महिलांसाठी ही योजना आहे, ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे. दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात . यामुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषणात सुधारणा होईल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही ही योजना सुरु झाली.होय, आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करावा किंवा आधार अधिप्रमाणनकरावे लागेल. योजनेसाठी आधार लिंक असलेले बँक खाते आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टल किंवा Nari Shakti Doot अॅपवर हे काम करता येतं. ऑफलाइनसाठी अंगणवाडी सेविका, सेतु केंद्र, ग्रामसेवक किंवा आपले सरकार केंद्रात मदत मिळेल. अर्जातील बदलांसाठी हमीपत्र आणि आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत. ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या किंवा Nari Shakti Doot अॅप डाउनलोड करा. स्थानिक अंगणवाडी सेविका, आशा सेविका किंवा महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा. अपात्र व्यक्तींच्या तक्रारींसाठीही पोर्टलवर सुविधा आहे.
हेही वाचा :
ट्रॅफिकने घेतला चिमुकल्याचा जीव! 5 तास Ambulance एकाच जागी
दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सव्वालाखांची छप्परफाड पगारवाढ
रूममेटशी भांडण अन् पोलीसांनी धाडधाड 4 गोळ्या झाडल्या, इंजिनियरची हत्या