अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे(engineer). मोहम्मद निजामुद्दीन (वय ३४) असे मृताचे नाव असून तो महबूबनगर (तेलंगणा) येथील रहिवासी होता. कुटुंबाने परराष्ट्र मंत्रालय आणि राज्य सरकारकडे मृतदेह भारतात आणण्यासाठी तातडीने मदत मागितली आहे.

ही घटना ३ सप्टेंबर रोजी सांता क्लारा येथे घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, निजामुद्दीनचा त्याच्या रूममेटसोबत वाद झाला आणि चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. शेजाऱ्याने पोलिसांना कळविल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वारंवार आज्ञा देऊनही निजामुद्दीनने शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिल्याचा दावा पोलिसांनी केला. यानंतर पोलिसांनी चार गोळ्या झाडल्या आणि तो जागीच ठार झाला.

मृत अभियंता गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत काम करीत होता. फ्लोरिडामधून संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तो कॅलिफोर्नियामध्ये कार्यरत होता(engineer). अलीकडेच त्याने वांशिक छळ आणि नोकरीतील अडचणींबाबत सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली होती.

निजामुद्दीनचे वडील मोहम्मद हसनुद्दीन यांनी भावनिक आवाहन केले असून, “माझ्या मुलाचा मृतदेह लवकरात लवकर भारतात परत आणण्यात यावा,” अशी विनंती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केली आहे.या घटनेमुळे महबूबनगरसह संपूर्ण तेलंगणामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमेरिकन पोलिसांच्या कारवाईबाबत सविस्तर चौकशीची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

हेही वाचा :

काजोलने पुन्हा मोडला ‘तो’ नियम; ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ चर्चेत
4 सख्ख्या बहिणींवर बलात्कार; हादरवणारा घटनाक्रम समोर
6 खेळाडू गायब; team India मध्ये मोठ्या बदलाचे संकेत