‘तू बाहेर भेट, तुझ्यावर फायरिंग करुन’ पुण्यात मेहंदी कार्यक्रमात राडा 5 लाखांची सोनसाखळी लुटली

पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, संगमवाडी परिसरात लग्नाच्या मेहंदी कार्यक्रमात एका टोळक्याने राडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून, आरोपींनी ५ तोळ्यांची सोन्याची साखळी (किंमत ५ लाख रुपये) जबरदस्तीने हिसकावून नेली आहे.

याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी मुख्य आरोपीसह ५ जणांना अटक केली असून, त्यांना १ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ही घटना संगमवाडी येथे २७ एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी नंदू अर्जुन काची (वय ५३, रा. फुगेवाडी) यांच्या नातेवाईकांच्या लग्नाचा मेहंदी कार्यक्रम सुरू होता. सर्वजण साऊंड सिस्टिमवर डान्स करत असताना आरोपी संतोष काची तिथे कारमधून आला. (Pune) काही वेळ डान्स केल्यानंतर संतोषने विनाकारण नंदू काची यांना शिवीगाळ करत त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच “तू मला बाहेर भेट, तुझ्यावर फायरिंग करून तुला जीवे ठार मारून टाकेन,” अशी गंभीर धमकी दिली.

वाद वाढल्यानंतर संतोषने आपला मुलगा आणि इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. या टोळक्याने फिर्यादी नंदू काची आणि त्यांचा मित्र गोपीनाथ चौर्य यांना हाताने बेदम मारहाण केली. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी संतोषने कोयता काढून हवेत फिरवला. कोयता पाहून लोक घाबरून बाजूला झाले, (Pune) याच संधीचा फायदा घेत त्याने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादींच्या गळ्यातील ५ तोळ्यांची (अंदाजे किंमत ५ लाख रुपये) सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली.

या गंभीर प्रकाराबाबत लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत खालील ५ जणांना अटक केली आहे:

१. संतोष काची (वय ४५, रा. ममतानगर, सांगवी)
२. यश काची (वय २०, रा. ममतानगर, सांगवी)
३. दत्ता रघुनाथ चव्हाण (वय ३७, रा. वारजे)
४. सुशील सूर्यकांत सर्वगौड (वय ४३, रा. पाटील इस्टेट, संगमवाडी)
५. यश दीपक सावंत (वय २३, रा. जुनी सांगवी)

या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने (Pune) त्यांना १ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत करत आहेत.

हेही वाचा

हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला

 बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर

AIमुळे बँकांमध्ये नोकर कपात? जगावर बेरोजगारीचं सावट