२००० मध्ये हृतिक रोशनसोबत “कहो ना प्यार है” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करून अमिषा पटेल एका रात्रीत स्टार बनली. तिच्या निरागसतेने आणि सौंदर्याने लोकांना भुरळ घातली. २००० च्या दशकातील क्रश असूनही, ती अविवाहित आहे. ५० वर्षीय अभिनेत्रीने(actress) अद्याप लग्न केलेले नाही. अलिकडेच एका मुलाखतीत अमिषा पटेलने लग्न का टाळले आहे हे उघड केले. तिने सुरुवातीपासूनच लग्नाबद्दलचा तिचा दृष्टिकोन स्पष्ट केला.

अमिषाचे काही चित्रपट खूपच गाजले. मात्र ती बॉलीवूडमध्ये स्थिरावू शकली नाही. अनेक पार्टीमध्ये अथवा तिच्या खासगी आयुष्यामुळे मात्र ती कायम चर्चेत राहिली. अमिषाने आपल्या आयुष्याबाबत रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्ट शो मध्ये खुलासा केला आहे. रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये, अमिषाने उघड केले की तिची पहिली प्राथमिकता नेहमीच तिचे करिअर राहिले आहे. तिला कोणाची पत्नी होण्यापूर्वी स्वतःला सेटल करायचे होते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, “मी शाळेत कधीही मुलांचा पाठलाग केला नाही. तेच असे करायचे.

त्यानंतर, मला खूप प्रस्ताव आले आणि अजूनही लग्नासाठी येत आहेत, पण ज्या मुलांना मी भेटले त्यांना लग्नानंतर मी घरी राहावे असे वाटत होते आणि मी काम करू नये असंही त्यांना वाटत होते आणि मला ते आवडले नाही. मला सुरुवातीला ‘अमिषा पटेल’ व्हायचे होते कारण मी माझ्या आयुष्याचा बराचसा भाग कोणाची तरी मुलगी म्हणून घालवला होता आणि मला माझे प्रौढ आयुष्य फक्त कोणाची तरी पत्नी म्हणून घालवायचे नव्हते.”

गदर अभिनेत्रीने (actress)खुलासा केला की चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिचे एक गंभीर नाते होते, परंतु ते एका कारणामुळे संपले. ती म्हणाली, “जे लोक तुम्हाला प्रेम करतात ते तुमचे करिअर यशस्वी होऊ देतील. मी माझ्या करिअरसाठी आणि प्रेमासाठी खूप काही गमावले आहे. मी माझ्या करिअरसाठी दुसऱ्या गोष्टीचा त्याग केला आणि मला वाटते की मी दोन्ही गोष्टींमधून केवळ शिकलेच आहे.”

अभिनेत्रीने पुढे स्पष्ट केले की, “तो माझ्यासारखाच दक्षिण मुंबईतील एका प्रतिष्ठित औद्योगिक कुटुंबातून आला होता. आमची पार्श्वभूमी आणि शिक्षण समान होते आणि कुटुंबातील वातावरणही सारखेच होते. सर्व काही ठीक होते, पण जेव्हा मी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या जोडीदाराला लोकांच्या नजरेत राहणे आवडत नव्हते आणि म्हणून मी प्रेमापेक्षा करिअरला प्राधान्य दिले आणि त्या नात्यातून बाहेर पडले”

अमिषा पटेल म्हणते की आज तिच्या अर्ध्या वयाचे पुरुष तिला लग्नासाठी प्रस्ताव देतात आणि तिला डेटवर येण्याची विनंती करतात. ती वयाने लहान असणाऱ्या पुरुषाशी लग्न करण्यासही तयार आहे. ती म्हणते, “जर मला योग्य व्यक्ती सापडली तर मी लग्नासाठी तयार आहे. म्हणतात ना ‘जिथे इच्छा असते, तिथे मार्ग असतो’, म्हणून असा व्यक्ती मला ज्यावेळी सापडेल, तेव्हा ती संधी मी सोडणार नाही; तो माझा जीवनसाथी असेल. मला अजूनही अनेक श्रीमंत कुटुंबांकडून लग्नाचे प्रस्ताव येतात.

माझ्या अर्ध्या वयाचे पुरुषही मला डेट करू इच्छितात आणि मी त्यासाठी तयारही आहे. पण पुरूष मानसिकदृष्ट्या प्रौढ असावा हीच माझी अपेक्षा आहे. मी माझ्यापेक्षा मोठ्या अनेक पुरुषांना भेटले आहे, परंतु त्यांचे मेंदू माशीइतकाही मोठा नाहीये.” अमिषा सध्या वेगवेगळ्या गोष्टी करत असून नुकताच आलेला गदर २ देखील प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा :

…….आणि नरेंद्र मोदी यांचा राजीनामा झालाच नाही…..!
या खेळाडूवर दु:खाचा डोंगर एकेकडे 5 षटकार तर दुसरीकडे वडिलांचे निधन
श्रिया पिळगांवकरने लग्नाबद्दल पहिल्यांदा केला खुलासा; म्हणाली