श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये काल सामना (match)पार पडला या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाची पहिल्या 10 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावले होते. त्यानंतर मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी चांगली भागिदारी केली. राशिद खान 24 धावा करुन बाद झाला पण त्यानंतर मोहम्मद नबीने कमान सांभाळली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये उभे करुन दमदार कामगिरी करत मोठी धावसंख्या उभारली. शेवटच्या ओव्हरमध्ये नबीने संघासाठी 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले.

नबीने डुनिथ वेल्लालगे याला शेवटच्या ओव्हरमध्ये 5 षटकार मारले हा दिवस या खेळाडूचा काळा दिवस होता. त्याला सामन्यामध्ये तर 5 षटकार मारलेच त्यानंतर त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. हा खेळाडू मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. सामन्यानंतर संघ व्यवस्थापकाने त्याला ही दुःखद बातमी दिली. त्यामुळे, तो खेळाडू सामना संपल्यानंतर लगेचच घरी निघून गेला. हा दुसरा कोणी नसून श्रीलंकेचा खेळाडू दुनिथ वेल्लालागे आहे, ज्याचे वडील आता या जगात नाहीत.

वृत्तानुसार, दुनिथ वेल्लालागेचे वडील सुरंगा वेल्लालागे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे कोलंबोमध्ये निधन झाले. २०२५ च्या आशिया कपमध्ये श्रीलंकेकडून दुनिथ वेलालेजने पदार्पण केले. पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याला बेंचवर ठेवण्यात आले होते. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना त्याच्यासाठी विशेष प्रभावी नव्हता. त्याच्या चार षटकांमध्ये त्याने एक विकेट घेतली आणि ४९ धावा दिल्या. डावाच्या शेवटच्या षटकात, २० व्या, अफगाणिस्तानच्या वरिष्ठ फलंदाज मोहम्मद नबीने वेलालेजविरुद्ध सलग पाच षटकार मारले.

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून दिनुथ वेल्लालागे निराश झाला. त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये त्याला संघ व्यवस्थापक आणि सहाय्यक कर्मचारी हाताळत असल्याचे दिसून आले आहे. असेही वृत्त आहे की त्याच्या वडिलांच्या निधनानंतरही वेल्लालागे मैदानात उतरण्यास तयार होता.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सने पराभव करून सुपर फोरमध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय उलटा ठरला. त्यांनी ७१ धावांत ५ विकेट्स गमावल्या. तथापि, नबी आणि रशीद खान यांनी शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करताना उत्कृष्ट कामगिरी केली आणि संघाला १६९ धावांपर्यंत पोहोचवले. तरीही, त्यांना पराभव पत्करावा लागला(match).

हेही वाचा :

श्रिया पिळगांवकरने लग्नाबद्दल पहिल्यांदा केला खुलासा; म्हणाली
भर कार्यक्रमात महाराष्ट्र गीत सुरूच होईना, CM फडणवीस उठले अन्…पाहा व्हिडीओ
पावसाचा इशारा! १० जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी