नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेलिब्रेटिंग वर्ल्ड बांबू डे’ कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला आणि या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या समयसूचकतेनं सर्वांनाच थक्क केलं आणि उपस्थितांचं मन जिंकलं. आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी व्यासपीठावर हजेरी लावली. कार्यक्रम सांगतेकडे आला आणि सर्वजण व्यासपीठावर असतानाच महाराष्ट्र(Maharashtra) गीत लावण्याची वेळ आली, तेव्हा काही तांत्रिक अडचणींमुळं महाराष्ट्र गीत तेथील ध्वनिक्षेपकावर वाजेना. ही बाब सर्वांच्याच लक्षात आली, व्यासपीठावरील उपस्थितांनीही एकमेकांकडे पाहिलं, कुजबूज सुरू झाली आणि तितक्यातच CM फडणवीसांनी जी कृती केली त्यानं सर्वांचच लक्ष वेधलं. सगळे एकटक त्यांच्याकडे पाहू लागले.

खिशात ठेवलेला मोबाईल फडणवीसांनी काढला आणि ते तिथून निघाले. कोणालाही काही कळायच्या आतच फडणवीस पोडियमपाशी आले आणि त्यांनी तत्परता दाखवत आपल्या मोबाईलमधून महाराष्ट्र गीत माईकसमोर लावलं. माईकच्या माध्यमातून ते महाराष्ट्रगीत सभागृहात निनादलं आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हेच स्वर प्रत्येकाच्या तोंडून अभिमानानं निघाले. एका स्वरात मुख्यमंत्र्यांसह तिथं उपस्थित साऱ्यांनीच हे महाराष्ट्र गीत गायलं. समयसूचकतेचे उत्तम मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमादरम्यान दाखवून देत सर्वांची मनं जिंकली आणि सोशल मीडियावरही हा व्हिडीओ लक्ष वेधून गेला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (19 सप्टेंबर 2025) मुंबईत आयोजित ‘सेलिब्रेटिंग वर्ल्ड बांबू डे’ कार्यक्रमात समयसूचकता दाखवली. कार्यक्रमात तांत्रिक अडचणींमुळे महाराष्ट्र गीत वाजू शकले नाही, तेव्हा त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून महाराष्ट्र गीत लावले आणि सर्वांसह ते गायले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.हा प्रकार गुरुवारी, 19 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत आयोजित ‘सेलिब्रेटिंग वर्ल्ड बांबू डे’ कार्यक्रमात घडला.कार्यक्रमाच्या समारोपावेळी महाराष्ट्र गीत वाजवण्याची वेळ आली, पण ध्वनिक्षेपकात तांत्रिक बिघाड झाल्याने गीत वाजले नाही. यावेळी CM फडणवीस यांनी तत्परतेने आपल्या मोबाईलमधून महाराष्ट्र (Maharashtra)गीत लावले आणि माईकच्या माध्यमातून ते सभागृहात वाजवले. त्यानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे गीत गायले.

हेही वाचा :

पावसाचा इशारा! १० जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
ORS प्यायल्यामुळे खरचं शरीरातील थकवा कमी होतो का? जाणून घ्या
पुढील 24 तासांत बनणार नवे रेकॉर्ड; ‘महावतार नरसिम्हा’ची आता ओटीटीवर डरकाळी