राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या अजित पवार यांनी नुकतंच नागपूर राष्ट्रवादीच्या इथं सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या संबोधनपर भाषणातून उपस्थितांना पक्षबांधणी, पक्षाचं काम यासंदर्भात सूचना आणि मार्गदर्शन केलं. सरतेशेवटी मात्र अजित पवारांनी त्यांच्याच शैलीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यरिता काही मंडळींना खडे बोलही सुनावले. यावेळी विशेषत: मंत्री पवारांच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळालं. शिबिरासाठी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, अदिती तटकरे आणि पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची उपस्थिती पाहायला मिळाली(Political).

मंत्री कोणताही असो, त्यांना पक्षापेक्षा इतर कामं जास्त महत्त्वाची वाटत असतील तर त्यांची जागा मोकळी करुया असा स्पष्ट इशारा अजित पवारांनी मंत्र्यांना दिला. ‘ज्यांना पालकमंत्रिपद मिळाल त्यांना तिथं जावंच लागेल. मंत्र्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरा’, असं सांगताना काही मंत्री जिल्हाध्यक्षांना विचारत नाहीत असं मात्र चालणार नाही असा सज्ज दम पवारांनी भरला.इथून पुढं मंत्र्यांना तीन दिवस मुंबईत, एक दिवस मतदारसंघात असे तीन दिवस पक्षासाठी द्यावे लागतील असा स्पष्ट इशारा देत ज्यांना वेळ देणं जमणार नाही, त्यांना खुर्ची खाली करावी लागेल असंही ते थेटच म्हणाले. खुर्ची रिकामी होताच दुसऱ्यांना संधी देऊ, अशी तंबी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना देत त्यांनी सतर्क केलं.

शुक्रवारी नागपुरात पार पडलेल्या चिंतन शिबिरात अजित पवार यांनी मंत्र्यांची कानउघडणी केली. काम न करता प्रसिद्धी घेणाऱ्यांना टोला लगावर माझ्यासारखं जमिनीवर सक्रिय राहा, जनसंवाद, संघटनात्मक पद भरती आणि त्यानंतर त्यावर विचार करण्याबाबतच्या सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या. पक्ष प्रवेश देताना त्या व्यक्तीची प्रतिमा जनमानसात चांगली असावी हे आधी तपासण्याचा सल्लाही त्यांनी दिला.प्राथमिक माहितीनुसार हे शिबीर सकाळी 9.30 वाजता सुरू झालं. मात्र अनेक मंत्री, आमदार तिथं उपस्थितच नव्हते. हे चित्र पाहून त्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत अजित पवारांनी म्हटलं, ‘पक्ष एक दिवस बोलवतो आणि आपण वेळेवर येत नाही.

इथून पुढं विमानासारखे दरवाजे बंद करू, जे उशिरा येतील त्यांना बाहेरच राहू द्या. त्यांना वेळेच महत्त्व कळू द्या’ असं म्हणत वक्तशीरपणा आणि वेळेच्या महत्त्वावरून त्यांनी साऱ्यांनाच सुनावलं.पक्षाची विचारधारा ठरवणे, स्थानिक निवडणुकीसाठी धोरण, युवा-महिला केंद्रित योजना आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणे.सर्व एनसीपी मंत्र्यांना, विशेषत: पालकमंत्र्यांना. पक्ष कार्याकडे दुर्लक्ष केल्यास पद सोडण्याचा स्पष्ट सल्ला.होय, परस्पर आदर आणि राज्य प्रगतीसाठी. स्थिरता ही प्राथमिकता असं पक्षाचं उद्दिष्ट असल्यानं हाच प्रयत्न असेल(Political).

हेही वाचा :

 विश्वचषकापूर्वी एक मोठी परीक्षा! महिला संघ…..
iPhone 17 खरेदी करण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही!
सुर्यकुमार यादवने का फलंदाजी केली नाही?