नीता अंबानींच्या अश्रूंची किंमत हार्दिकला मोजावी लागणार? ‘मुंबई इंडियन्स’ IPL संपण्याआधीच मोठा निर्णय घेणार?

पाच वेळा इंडियन प्रिमिअर लीगची ट्रॉफी जिंकलेला संघ 243 धावांचं (tears) लक्ष्य देऊनही पराभूत झाल्याचं थक्क करणारं चित्र घरच्या मैदानावर पाहण्याची दुर्देवी वेळ मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांवर बुधवारी रात्री आली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाची सनरायझर्स हैदराबादच्या संघाने तुफान धुलाई केली. 244 चं टार्गेट सनरायझर्सच्या संघाने 8 बॉल आणि 6 विकेट्स शिल्लक असतानाच गाठलं. पॉवर प्लेमध्येच सनरायझर्सचे सलामीवर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने 90 धावांचा टप्पा ओलांडला. या दोघांच्या आक्रमणापुढे मुंबईच्या गोलंदाजांनी नांगी टाकल्याचं दिसून आलं. सनरायझर्सचे फलंदाज इतकी स्फोट फलंदाजी करत होते की मुंबईच्या गोलंदाजीची पिसं काढताना पाहून संघाच्या मालकीण नीता अंबानी भावूक झाल्याचा क्षण कॅमेरात टीपला गेला. मात्र त्यापेक्षाही सूचक कृती त्यांनी मुंबईने सामना गमावल्यानंतर केली. याच कृतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

सामान्यपणे नीता अंबानी मुंबईचा सामना असेल त्या ठिकाणी मैदानावर (tears)आवर्जून पोहोचतात. बुधवारीही त्या वानखेडेच्या मैदानावर मुलगा आकाश अंबानी आणि सून राधिकासोबत हजर होत्या. मुंबईच्या फलंदाजांना आणि खास करुन रायन रेकिल्टनने 55 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 123 धावांच्या जोरावर 243 धावांपर्यंत मजल मारल्याने नीता अंबानी खुश दिसत होत्या. पण फलंदाजीसाठी आलेल्या सनरायझर्सच्या सलामीवीरांनी काऊंटर अटॅक सुरु केल्यानंतर मैदानात मुंबई इंडियन्सचे खेळाडू तर मैदानाबाहेर मालकीण नीता अंबानी अस्वस्थ दिसून आल्या. अभिषेक आणि हेडने केलेली धुलाई पाहून सामन्यातील सातव्या ओव्हरमध्ये त्यांना अश्रू अनावर झाल्याचा एक क्षण कॅमेरात टीपला गेला. हे फोटो तुफान व्हायरल झाले.

आधी हेड आणि अभिषेक नंतर हेन्रीच कार्लसनने आधी नितीश रेड्डीसोबत (tears)आणि नंतर सलील अरोराच्या मदतीने संघाला सहज विजय मिळवून दिला. कार्लसनने 30 बॉलमध्ये नाबाद 65 धावांची खेळी केली. त्याने 7 चौकार आणि चार षटकार लगावले. सलीलनेही शेवटाकडे 10 चेंडूंमध्ये नाबाद 30 धावा केल्या. त्यानेही जसप्रीत बुमराहसारख्या वर्ल्ड क्लास गोलंदाजाला षटकार लगावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आपल्याच संघाची ही दनयीन अवस्था नीता अंबानींना पहावली नाही आणि त्या सामना संपताच रागात मैदानाबाहेर निघून गेल्या. त्या मैदानाबाहेर पडतानाचेही अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.

नीता अंबानी नाराज, खिन्न झाल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या सामन्यानंतर दिलेल्या एका वेगळेपणावरुन कर्णधार हार्दिक पांड्याकडून संघ मालक कर्णधारपद काढून घेणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. नीता अंबानी रागात वानखेडे स्टेडियम बाहेर पडताना दिसल्याचा दावा करत अनेकांनी फोटो शेअर केले आहेत.सामन्यादरम्यान कॅमेरासमोर भावूक झालेल्या नीता अंबानी सामान्यपणे सामन्यानंतर संघाला भेटतात. संघातील खेळाडूंशी बोलता. मात्र बुधवारी त्या सरळ चालत मैदानाबाहेर आल्या आणि सून राधिकासोबत कारमध्ये बसून निघून गेल्या.

यावरुनच त्या हार्दिकच्या नेतृत्वावर नाराज असून त्याची उलचबांगडी होण्याचे हे संकेत तर नाही ना अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. तुम्हीच पाहा अशी एक व्हायरल पोस्ट…मुंबईच्या संघाचा हा आठव्या सामन्यातील सहावा पराभव ठरला आहे. मुंबईचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी असून इथून त्यांना पात्र व्हायचं असेल तर सगळे सामने जिंकवे लागणार आहेत.

हेही वाचा

हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला

 बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर

AIमुळे बँकांमध्ये नोकर कपात? जगावर बेरोजगारीचं सावट