कोल्हापूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (elections)पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाल सुरू आहे. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकमेव नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे.

प्राथमिक सूत्रांनुसार, राजू दिंडोर्ले भारतीय जनता पक्षाच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपमध्ये प्रवेशासाठी प्राथमिक स्तरावर बैठकाही झाल्या आहेत, पण अटी आणि नियमांमुळे निर्णय अद्याप लांबणीवर आहे. कोल्हापूरमधील त्यांच्या प्रभागातील ताकद लक्षात घेता, महायुतीकडून भाजपमध्ये त्यांना घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही राजकीय सूत्रांनी सांगितले.

तथापि, या चर्चांवर भाजप किंवा मनसेने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर प्रतिक्रिया विचारली असता, राजू दिंडोर्ले यांनी स्पष्ट केले, “मी कोणत्याच पक्षात जाणार नाही आणि मनसेकडूनच निवडणूक(elections) लढवणार आहे.”

कोल्हापूरमध्ये या राजकीय हालचालीमुळे आगामी निवडणूक पूर्वी मोर्चेबांधणी आणि पक्षांतर्गत हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, निवडणूकपूर्वी अशी गतीशील परिस्थिती पक्षांसाठी महत्वाची ठरणार आहे.

हेही वाचा :

दोस्ताच्या बायकोचे अश्लील AI व्हिडिओ तयार केले, ब्लॅकमेल करून
शरद पवारांच्या पक्षाचा कार्यकर्त्याचा गेला जीव; काय आहे नेमकं प्रकरण?
शेतकऱ्यांसाठी 4 टक्के व्याजदरावर 5 लाख रुपयांचे कर्ज…