मुख्यमंत्री(Chief Minister) देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्ग 4 व 4 अ च्या टप्पा-1 प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. या टप्पा-1 मध्ये गायमुख जंक्शन, गायमुख गाव, घोडबंदर रोड, कासारवडवली, विजय गार्डन याप्रमाणे मार्गाचा समावेश आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या ट्रायलला हिरवा झेंडा दाखवला असून स्वतः मेट्रोने प्रवास करून मार्गाची पाहणी केली. कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टीच्या मार्गदर्शनानुसार सर्व तांत्रिक प्रणाली सज्ज असून, या विभागातील उड्डाणपूल, मार्गिका आणि ओव्हरहेड इक्विपमेंट पूर्ण झाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी(Chief Minister) या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, हा मार्ग अत्यंत महत्वाचा असून 16 हजार कोटी रुपयांचा खर्च यावर करण्यात आला आहे. या मार्गावर चालणारी मेट्रो 8 डब्यांची असेल आणि पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर, ठाणे आणि मुंबईला जोडणारा हा मार्ग ठरणार आहे. संपूर्ण 58 किलोमीटरचा हा मार्ग देशातील सर्वात मोठा मेट्रो प्रकल्प ठरणार असून, यामुळे जवळपास 21 लाख लोकांना प्रवासाची सुविधा मिळणार आहे. मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होईल आणि रस्त्यावरील वाहतूक नियमित राहील.

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, हा टप्पा पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रयत्न झाले. मोगरपाड्याला डेपो मिळवण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष दिले आणि अनेक अडचणींवर मात करून जागा उपलब्ध करून दिली. तसेच, आमदार सरनाईक यांनी देखील या प्रकल्पासाठी विशेष योगदान दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, या टप्प्याच्या यशानंतर पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत संपूर्ण मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी खुले करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा :

 लग्नाच्या पहिल्याच रात्री घडायचं असं काही की….
यंदाची दिवाळी धो धो पावसात जाणार! मान्सूनचा परतीचा प्रवास…
 Abhishek Sharma च्या दमदार खेळीनंतर बहिणचं रिएक्शन Viral