दिल्लीतील लाहोरी गेट परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात चिंता निर्माण केली आहे. एका महिलेनं(woman) पोलिसांत तक्रार दाखल करत सांगितले की तिच्या पतीचा मित्र अनीस सिद्दीकीने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा गैरवापर करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले. या फोटोचा आधार घेत त्याने तिला ब्लॅकमेल केले आणि वारंवार बलात्कार केला. आरोपीच्या आई आणि बहीणही या कृत्यात सहभागी असल्याचा पीडितेचा दावा आहे.

३० वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबासोबत लाहोरी गेट परिसरात राहते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील वाढदिवसाच्या कार्यक्रमात अनीसने तिच्या सह फोटो घेतला, त्याचा वापर करून आक्षेपार्ह एआय फोटो आणि व्हिडिओ तयार केले. या वर्षी जूनमध्ये, जेव्हा तिचा पती घरी नव्हता, तेव्हा आरोपीने या फोटोचा वापर करून तिला धमकावले आणि ब्लॅकमेल करत बलात्कार केला. पीडितेला(woman) आरोपीला पाच लाख रुपये आणि १०० ग्रॅम सोन्याचे दागिने दिले, तरीही आरोपी थांबला नाही आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा तिचे एआय व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

पीडितेच्या पतीने चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर पीडितेने धैर्य दाखवत पोलिसांत एफआयआर नोंदवली. सध्या तपास एसआय अवंती राणी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे, मात्र अद्याप आरोपी व त्याच्या कुटुंबातील कोणालाही अटक केलेली नाही. ही घटना एआय तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर आणि महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी 4 टक्के व्याजदरावर 5 लाख रुपयांचे कर्ज…
 डीमार्टपेक्षा जास्त स्वस्त सामान कुठं मिळतं?
बळजबरी तरूणीच्या खोलीत घुसला अन् ……