मुंबईच्या मीरा-भाईंदर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 76 वर्षीय विठ्ठल तांबे हे 16 सप्टेंबर रोजी घरातून बाहेर पडले, मात्र परत आले नाहीत. दोन दिवसांच्या शोधानंतर कुटुंबियांनी काशिमिरा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल केली(crime).

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासला असता उघडकीस आले की विठ्ठल तांबे शेवटचे एका सलूनमध्ये जाताना दिसले, पण ते परत बाहेर आले नाहीत. पुढील तपासात धक्कादायक सत्य समोर आले. सीसीटीव्हीमध्ये सलून चालकांनी त्यांच्या गळ्यातील सोने काढल्याचे आणि त्यांची हत्या केल्याचे दिसून आले. आरोपीने मृतदेह सलूनमधून बाहेर ओढत नेला आणि ड्रेनेजमध्ये टाकून फरार झाला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तपास सुरू आहे(crime). ही घटना मुंबईतील गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंतेचे कारण ठरली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

मनसेला कोल्हापुरात झटका बसणार? जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?
तरुणाच्या जुगाडाला तोड नाही, प्लॅस्टिकपासून बनवली नवी कोरी बोट…
एसटी महामंडळात बम्पर भरती, सरकारची मोठी घोषणा