बंगळुरूच्या व्हाईटफील्ड परिसरात १६ सप्टेंबरच्या पहाटे घडलेली घटना शहराला धक्का देणारी ठरली आहे. २४ वर्षीय रिथू (नाव बदललेले), जी एका खाजगी बँकेत काम करते, तिच्या को-लिव्हिंग पीजीमध्ये भीषण हल्ल्याचा शिकार झाली(crime).

पहाटे ३ वाजता दाराची बेल वाजली; रिथूने तिच्या मैत्रिणीचा अंदाज लावून दरवाजा उघडला.आरोपी साई बाबू चेन्नुरू (३७) कथितपणे आत घुसला, चाकू काढून महिलेवर हल्ला केला.आरोपीने महिलेच्या पाठीवर वार केला, तिला जमिनीवर ढकलले, जबरदस्ती केली आणि कपडे काढून मोबाईलवर फोटो काढले(crime).

७०,००० रुपयांची खंडणी मागितली; रिथूने १४,००० रुपये डिजिटल वॉलेटद्वारे ट्रान्सफर केले.आरोपीने घटनेची माहिती कुणालाही सांगू नये अशी धमकी दिली.आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, लैंगिक छळ, विनयभंग, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली.

आरोपीने १७ सप्टेंबर रोजी प्रतितक्रार दाखल केला असून, त्याने पीडितेसोबत काही महिन्यांपासून प्रेम असल्याचे आणि झालेल्या भांडणामुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला.प्राथमिक तपासानुसार पीडित आणि आरोपी यांची काही महिन्यांपासून ओळख होती.आरोपी साईला पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की ही घटना अत्यंत संवेदनशील व गुंतागुंतीची असल्याने सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू ठेवला जात आहे.रिथू सुरक्षित आहे आणि पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा :

निर्वस्त्र हायवेवर फेकून दिलं, डॉक्टरचं विकृत कृत्य 
डोनाल्ड ट्रम्प यांचा आता H-1B Visa धारकांना दणका!
‘वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा’; अजित पवार कोणावर कडाडले?