भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने या तिसऱ्या (match)सामन्यामध्ये अनेक आश्चर्यजनक निर्णय घेतले. र्वांना खेळण्याची संधी देण्यासाठी त्याने स्वतःला ११ व्या क्रमांकावर ठेवले. ओमानविरुद्ध, सूर्या वगळता सर्वांनी फलंदाजी केली.

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (match)ओमानविरुद्ध फलंदाजी न करता सर्वांना आश्चर्यचकित केले. तथापि, त्याने सामन्याच्या सादरीकरणादरम्यान विनोदी उत्तर देत ओमान संघाचे आणि हार्दिक पंड्याचे कौतुक केले. भारतीय कर्णधाराने सामन्यात त्याच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल विनोद केला. सर्वांना खेळण्याची संधी देण्यासाठी त्याने स्वतःला ११ व्या क्रमांकावर ठेवले. ओमानविरुद्ध, सूर्या वगळता सर्वांनी फलंदाजी केली, जो चर्चेचा विषय होता.

भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने या तिसऱ्या सामन्यामध्ये अनेक आश्चर्यजनक निर्णय घेतले आणि हे पाहुन सर्वानाच धक्का बसला होता. त्यानंतर सोशल मिडियावर यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याने त्याच्या जागेवर कालच्या सामन्यामध्ये संजू सॅमसनला फलंदाजीसाठी पाठवले होते. तर जसप्रीत बुमराहला देखील त्याने विश्रांती दिली होती. त्याने वरुण चक्रवर्तीला देखील संघाबाहेर ठेवले होते आणि त्यानंतर त्याने अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांना खेळवले.

सामन्यानंतर, सूर्या म्हणाला, “पुढच्या सामन्यापासून ११ व्या क्रमांकावर येईपर्यंत मी नक्कीच वाट पाहणार नाही. एकंदरीत, मी म्हणेन की ओमानने काही अद्भुत क्रिकेट खेळले. मला माहित होते की त्यांच्या संघात त्यांचे प्रशिक्षक सुलू सर यांच्याबद्दल थोडीशी कुरकुर असेल. ते आश्चर्यकारक होते. त्यांना फलंदाजी करताना पाहणे मजेदार होते.”

पाकिस्तानकडे दुर्लक्ष
आशिया कप २०२५ च्या शेवटच्या गट सामन्यात ओमानवर विजय मिळवल्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यानंतरच्या सादरीकरणात पुन्हा एकदा पाकिस्तानवर टीका केली. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर ओमानवर २१ धावांनी मात करून भारताने अपराजित संघ म्हणून सुपर फोरमध्ये प्रवेश केला.

युएई, पाकिस्तान आणि ओमानविरुद्ध प्रभावी विजय मिळवल्यानंतर, भारताने अ गटात अव्वल स्थान पटकावले. आता त्यांचा सामना रविवारी, २१ सप्टेंबर रोजी दुबई येथे सुपर फोरमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. पुढील सामन्यापूर्वी, सूर्यकुमार यादव यांना विचारण्यात आले की संघ या रोमांचक स्पर्धेसाठी तयार आहे का.

सुपर ४ साठी सज्ज
तथापि, भारतीय कर्णधाराने पाकिस्तानचे नाव घेण्याचे टाळले आणि सुपर फोरमधील सर्व संघांचा सामना करण्यास ते तयार असल्याचे सांगितले. सामन्यानंतर सूर्यकुमार म्हणाले, “आम्ही सुपर फोरसाठी पूर्णपणे तयार आहोत.”

हेही वाचा :

टीम इंडियाचा सलग तिसरा विजय,
अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे?
RBI कडून डेबिट कार्ड, लेट पेमेंट आणि मिनिमम बॅलेन्सबाबत मोठे बदल,