दहावी- बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा म्हणजे शैक्षणिक जीवनातील एक (exams) अतिशय महत्त्वाचा टप्पा. अशा या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जारी करण्यात आले असून, त्यात मुलींनीच बाजी मारल्याचं स्पष्ट झालं आहे. काऊन्सिल ऑफ द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन्स म्हणजेच CISCE च्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी परीक्षेचे निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. बोर्डाच्या परीक्षांमध्ये यंदा मुलींनीच वर्चस्व मिळवलं असून, या परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी results.cisce.org वर जाऊन परीक्षा क्रमांक आणि युनिक आयडीच्या माध्यमातून निकाल आणि स्कोअरकार्ड तपासू शकता.

इयत्ता दहावीच्या ICSE परीक्षांमध्ये एकूण 99.18 टक्के विद्यार्थी (exams)उत्तीर्ण झाले. तर, बारावी म्हणजेच ISC परीक्षेचे निकाल 98.13 टक्के इतक्या प्रमाणात लागले. ICSE परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या 99.37 टक्के तर मुलांची संख्या 98.84 टक्के इतकी आहे. तर, बारावी ISC परीक्षेत 99.37 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, 98.84 टक्के मुलं उत्तीर्ण झाली.विद्यार्थी आणि पालकांनी अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन कॅप्चा कोडवर जात ‘Show Result’ वर क्लिक करावं आणि मार्कशीट प्रिंट करावी. निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम Index Number आणि Unique ID ची गरज असेल हे लक्षात घ्या. निकाल पाहण्यासाठीची अधिकृत वेबसाईट आहे results.cisce.org
याशिवाय खाली संकेतस्थळांवरही निकाल पाहता येईल
cisce.org
results.cisce.org
digilocker.gov.in
web.umang.gov.in
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (exams) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मागील वर्षी 5 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यामुळं यंदाही निकाल 1 ते 10 मे दरम्यान लागण्याची शक्यता आहे. तर, इयत्ता दहावीचा निकाल 15 मे आधी लागण्याची शक्यता आहे.यंदाच्या वर्षी 10 फेब्रुवारी ते 11 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. तर, 20 ते 18 मार्च 2026 दरम्यान दहावीची परीक्षा पार पडली होती. सध्या या परीक्षेतील निकालांच्या प्रक्रियेमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुणपत्रिकेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी त्यावर क्युआर कोड देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्याीची माहिती मिळू शकेल.
हेही वाचा
हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर