कोकणातील आंबा बाजारात(dropped) सध्या ग्राहकांसाठी दिलासादायक चित्र दिसत आहे. प्रसिद्ध हापूस आंबा आणि पायरी आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाल्याने त्यांच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. मागील आठवड्याभरात आवक झपाट्याने वाढल्याने बाजारभाव खाली आले असून सर्वसामान्य ग्राहकांनाही आता दर्जेदार आंबा परवडणाऱ्या किमतीत मिळू लागला आहे.

सध्या बाजारात पायरी आंबा (dropped) सुमारे २०० ते २५० रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे, तर देवगड हापूस आंब्याची किंमत ३०० ते ३५० रुपये प्रति डझनपर्यंत खाली आली आहे. यापूर्वी हाच हापूस ४०० ते ५०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. अचानक वाढलेल्या पुरवठ्यामुळे दरात ही घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.यंदाच्या हंगामात हवामानातील मोठ्या बदलांचा आंबा उत्पादनावर स्पष्ट परिणाम झाला.
सुरुवातीला ढगाळ वातावरण, (dropped) त्यानंतर अवकाळी पाऊस आणि मग वाढलेले तापमान यामुळे फळधारणेत अडथळे आले. काही भागांत उत्पादन घटले, तर काही ठिकाणी आंबा अपेक्षेपेक्षा लवकर पिकल्याने तो मोठ्या प्रमाणात एकाचवेळी बाजारात आला.तज्ज्ञांच्या मते, तापमानात झालेल्या वाढीमुळे आंब्याचे पिकणे वेगाने झाले आणि त्यामुळे पुरवठा अचानक वाढला. परिणामी मागणीच्या तुलनेत जास्त माल बाजारात आल्याने दर कमी झाले.
मात्र पुढील काही दिवसांत (dropped) आवक स्थिर झाली तर दर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, कमी झालेल्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक ठिकाणी हापूस आंब्याला मोठी मागणी दिसून येत आहे. त्यामुळे यंदा अधिकाधिक लोकांना कोकणातील अस्सल आंब्याचा आस्वाद घेण्याची संधी मिळत आहे.