महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात (examination) आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला असून यंदाही निकालात मुलींनीच आघाडी घेतली आहे. राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून मुलींचा निकाल ९३.१५ टक्के तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के नोंदवला गेला आहे.यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत ९४.१४ टक्के निकालाची नोंद केली आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८४.१४ टक्के लागला आहे. पुणे, मुंबईसह इतर विभागांचाही निकाल समाधानकारक लागला असून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. पुणे विभागाचा निकाल ९१.२५ टक्के, मुंबई ९०.०८ टक्के, अमरावती ९०.९२ टक्के, नाशिक ९०.७२ टक्के, कोल्हापूर ८९.९७ टक्के, नागपूर ८८.६७ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सुमारे ८८ टक्क्यांच्या आसपास लागला आहे.

राज्यातील नऊ विभागांमधून १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. (examination) शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची घोषणा केली. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना mahahsscboard.in, hscresult.mahahsscboard.in आणि hscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर जाऊन आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून निकाल पाहता येईल. (examination) निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना डिजीलॉकरवर डिजिटल मार्कशीटही उपलब्ध होणार आहे.दरम्यान, निकालानंतर गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळवण्यासाठी मंडळाकडून लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा
मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी
मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?
गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल