बॉलिवूडमधील गोड जोडप्यांपैकी एक म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. चर्चेचं मुख्य कारण आहे – कतरिना लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या चर्चेला चालना देणारी ही बातमी कधी कधी अफवा वाटत असली तरी, बॉलिवूड(entertainment news) हंगामाच्या एक्सक्लूझिव्ह रिपोर्टनुसार, कतरिना खरंच प्रेग्नंट आहे.

कतरिनाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. पुढील महिन्यात 15 ते 30 ऑक्टोबर दरम्यान तिच्या घरी बाळाचं आगमन होण्याची शक्यता आहे. सध्या कतरिना आणि विकी या बातम्या सार्वजनिक करण्यास अजिबात तयार नाहीत. बाळाच्या जन्मानंतरच ते अधिकृत घोषणा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लग्न आणि वैयक्तिक आयुष्य
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेंस फोर्टमध्ये राजेशाही थाटात लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि क्षण सोशल मीडियावर(entertainment news) शेअर करत त्यांनी लिहिले होते, ‘आमच्या हृदयात फक्त प्रेम आणि कृतज्ञता आहे. या नव्या प्रवासासाठी तुम्हा सर्वांच्या प्रेमाची आणि आर्शीवार्दाची अपेक्षा आहे.’
शांत स्वभावाचा रहस्य
गेल्या वर्षी कतरिनाला विचारण्यात आले की ती नेहमी इतकी शांत आणि संयमित कशी दिसते. त्यावर तिने सांगितले, ‘जेव्हा मला कुठल्याही गोष्टीचा ताण येतो, तेव्हा मी घरी जाऊन 45 मिनिटं सतत बोलत राहते. विक्की मध्येच म्हणतो की, ही ओळ समजली नाही किंवा इंग्रजी थोडी वेगळी होती, पण तो पूर्ण लक्ष देऊन आणि प्रेमाने ऐकतो. यामुळे माझं मन हलकं होतं आणि मी रिलॅक्स होते.’ या उत्तरातून त्यांच्या नात्यातील विश्वास आणि स्नेह स्पष्ट दिसून येतो.

कतरिना शेवटचं ‘टायगर 3’ (2023) आणि ‘मेरी क्रिसमस’ (2024) या चित्रपटांमध्ये झळकली होती. तर विकी कौशल नुकताच ‘छावा’ या चित्रपटात दिसला, जो २०२५ मधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. याशिवाय, दोघेही आगामी प्रोजेक्टसाठी चर्चेत आहेत आणि प्रेक्षक त्यांचा पुढील प्रोजेक्ट आणि बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
चाहत्यांची उत्सुकता
कतरिना आणि विकीच्या बाळाच्या आगमनाची बातमी चाहत्यांसाठी मोठा उत्साहाचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या नव्या जीवन प्रवासाबाबत उत्सुकता व्यक्त करत आहेत. बाळाच्या जन्मानंतर कतरिना आणि विकीकडून अधिकृत घोषणा होण्याची सर्वांना अपेक्षा आहे, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये ही गोड बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे.
हेही वाचा :
मराठवाडा, सोलापुरात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात गावकरी अडकले;
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा हेल्दी टेस्टी दही कबाब,
गुंतवणुकदारांनो सावध व्हा! भारतीय शेअर बाजारात आजही होणार घसरण,