सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दही(breakfast) कबाब बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल. जाणून घ्या दही कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.

सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालाच काहींना काही घाई (breakfast) असते. कामाला जाण्याची घाई, लहान मुलांना शाळेत जाण्याची घाई इत्यादी सर्वच गोष्टींची घाई असते. त्यामुळे घाईच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात कायमच तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया बिघडते. दिवसाची सुरुवातच अस्वस्थ आणि बिघडलेल्या पचनक्रियेने झाली तर दिवस अतिशय खराब जातो. त्यामुळे नाश्त्यात हलके आणि सहज पचन होणारे पदार्थ बनवावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
दही कबाब हा पारंपरिक पदार्थ आहे. दही कबाब तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा कुठेही बाहेर फिरायला जाताना बनवू शकतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. पण हे ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही दही कबाब बनवू शकता. जाणून घ्या दही कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
दही
पनीर
बेसन
कांदा
आलं लसूण पेस्ट
हिरवी मिरची
जिऱ्याची पावडर
गरम मसाला
मीठ
तेल
कृती:
दही कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या चाळणीवर कॉटनचे कापड घेऊन त्यावर दही ओतून त्यातील सर्व पाणी काढून घ्या.
दह्यातील पाणी पूर्णपणे काढल्यानंतर चक्का वाटीमध्ये काढून घ्या.
त्यानंतर त्यात किसलेले पनीर, भाजलेले बेसन, बारीकचिरलेला कांदा, हिरवी मिरची, धणेपाने, आले-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
तयार केलेल्या मिश्रणात गरम मसाला, लाल तिखट, जिऱ्याची पावडर आणि हळद टाकून मिक्स करा.
तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे कबाब बनवून कढईमधील गरम तेलात दोन्ही बाजूने भाजून घ्या.
तयार केलेले कबाब तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता.
हेही वाचा :
90 टक्के लोकांना माहिती नाहीत, क्रेडिट कार्डशी संबंधित ‘या’ गोष्टी
झोपण्यापूर्वी फक्त लावा कोरफड, चेहऱ्यामध्ये होतील चमत्कारिक बदल,
टीम इंडिया भिडणार बांगलादेशसोबत, हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड?