बारावीच्या निकालाची तारीख अन् वेळ ठरली, mahahsscboard.in वर पाहा रिझल्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर (announcement) करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता आता संपणार आहे.

राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in ला भेट द्यावी. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक आणि आईचे पहिले नाव यासारखी माहिती आवश्यक असू शकते.

निकाल जाहीर होण्यापूर्वी त्याच दिवशी सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत निकालाचा एकूण टक्का, विभागनिहाय निकाल, मुला-मुलींची कामगिरी, गुणवंत विद्यार्थी तसेच इतर महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.

मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी माध्यम प्रतिनिधींना पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, पालकांच्याही नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही वाचा

उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट

कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा

कोहिनूर हीरा पुन्हा भारतात येणार