मोठी बातमी! मृतांचा मेंदू, हृदय आणि कलिंगड खाऊन कुटुंबातील त्या मृत्यूंप्रकरणी अत्यंत धक्कादायक खुलासाफॉरेन्सिक चाचणीत नेमकं काय?

मुंबईतील पायधुणी येथील डोकाडिया कुटुंबाने बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच संपले. याप्रकरणी आता मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. फॉरेन्सिक चाचणीत अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबईमधील पायधुणी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा या घटनेत मृत्यू झाला होता. या कुटुंबाने रात्री बिर्याणी खाल्ली. तर मध्यरात्रीWatermelon खाल्ले होते. त्यानंतर सकाळी उलट्या आणि जुलाबाचा त्रास त्यांना झाला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. (family) आता याप्रकरणात फॉरेन्सिक चाचणीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

फॉरेन्सिक अहवालानुसार, डोकाडिया कुटुंबातील मृतांचे महत्वाचे अवयव हिरवट पडल्याचे प्राथमिक चाचणीत समोर आले आहे. मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती समोर आली आहे.तज्ञांच्या मते सामान्य अन्न विषबाधेपेक्षा ही स्थिती वेगळी आहे. विषबाधेची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. असे बदल जेव्हा एकाच वेळी अनेक अवयवांमध्ये दिसतात,(family) तेव्हा एखाद्या विषारी घटका शरीरात पसरतो, असे डॉक्टरांचे संकेत आहेत. नवीन खुलास्यामुळे चौघांच्या मृत्यूला घेऊन संशय आणखीन बळावला आहे. तर अब्दुल्ला यांच्या शरीरात मोर्फिन देखील आढळले आहे.

गेल्या शनिवारी डोकाडिया कुटुंबियांनी बिर्याणी खाल्ली आणि नंतर झोपण्यापूर्वी कलिंगड खाल्ले होते. सकाळी त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलींचा जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरात वेदनानाशक औषधांचे घटक आढळले होते. अन्न आणि औषध प्रशासनाने डोकाडिया यांच्या घरातून बिर्याणी, कलिंगड, माठातील पाणी, शिजवलेला व कच्चा भात, चिकन, खजूर आणि मसाले असे 11 प्रकारचे नमुने जप्त केले होते.

पण केवळ अन्नातून इतक्या लवकर विषबाधा कशी होऊ शकते हा (family) तज्ज्ञांसमोर यक्ष प्रश्न होता. याप्रकरणी रासायनिक प्रयोगशाळेत ही नमुने पाठवण्यात आले होते. फॉरेन्सिक अहवालानुसार डोकाडिया कुटुंबातील मृतांचे महत्वाचे अवयव हिरवट पडल्याचे समोर आले आहे. आता हा घातपात आहे की, एखाद्या औषधाची तीव्र प्रतिक्रिया आहे या दिशेने तपासाची चक्र फिरण्याची शक्यता आहे. डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री बिर्याणी खाल्ली आणि मध्यरात्री कलिंगड खाल्ले होते. चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. दोन्ही मुली बेशुद्ध आढळल्या. रुग्णालयात नेताच एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर पालकांचा मृत्यू झाला.

हेही वाचा

उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट

कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा

कोहिनूर हीरा पुन्हा भारतात येणार