मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) हैदराबाद गॅझेटियर (‘जीआर’) विरोधातील याचिकेवर आज (दि. २२) सुनावणीस नकार दिला आहे. यामुळे मराठावाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एने गणेशोत्सवात मुंबईत मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण केले होते. पाच दिवसांनंतर राज्य सरकारने त्यांच्याकडून मागितलेल्या हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्याच्या आदेशाला मान्यता दिली.

हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देणाऱ्या आदेशाविरोधात महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सदानंद मंडलिक आणि कुणबी सेना यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court)याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन आदेश घटनाबाह्य असल्याचा दावा करून त्याच्या रद्दीची आणि सुधारणा करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने तांत्रिक कारणांमुळे याचिकेला नकार दिला.

कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिक www.aaplesarkar.mahaonline.gov.in
या वेबसाईटवर अर्ज करू शकतात. अर्ज तहसील कार्यालयात पाठवला जातो आणि योग्य कागदपत्रांसह उपविभागीय अधिकारी अंतिम कुणबी प्रमाणपत्र जारी करतात, ज्यासाठी साधारण २१ ते ४५ दिवस लागू शकतात.

प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये अर्जदाराचा आणि नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड इ.), पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, लाईट बिल, 7/12 किंवा 8 अ उतारा इ.), तसेच जात दाखला तयार करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्जावर १० रुपये कोर्ट फी स्टॅम्प व अर्जदाराचा फोटो आणि १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि रक्तसंबंधातील नातेवाईकाचे कुणबी जातीचा पुरावा आवश्यक आहे.

हेही वाचा :

Lamborghini पळवण्याचा मोह 52 वर्षीय ड्रायव्हरला पडला महागात…
देवेंद्र फडणवीस यांनी केले एकनाथ शिंदेंचे अभिनंदन
 लग्नाच्या पहिल्याच रात्री घडायचं असं काही की….