रविवारी सकाळी कोस्टल रोडवर एका लॅम्बोर्गिनी(Lamborghini) कारचा भीषण अपघात झाला. या कारचालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ती दुभाजकावर आदळली. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. या सुपरकारचा चालक एक 52 वर्षीय व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त लॅम्बोर्गिनी (Lamborghini)कार आशित शाह (52) नावाची व्यक्ती चालवत होती. ही व्यक्ती दक्षिण मुंबईकडे जात असताना अपघात झाला. कोस्टल रोडवरील खांब क्रमांक 53 जवळ कारवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकावर आदळली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने असा अपघात घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुदैवाने चालक शाह यांना मोठी दुखापत झाली नाही. या अपघाताची नोंद वरळी पोलिस ठाण्यात करण्यात आली.

माहिती मिळताच वाहतूक पोलिसही घटनास्थळी पोहोचले. “ही व्यक्ती दक्षिण मुंबईकडे जात होती आणि घटनेचा परिणाम पाहता असे दिसते की कार ताशी 100 किलोमीटर वेगाने जात होती,” असं अधिकाऱ्याने सांगितल्याचं वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे. सकाळची वेळ असल्याने सुदैवाने कार इतर वाहनांना धडकली नाही. कोणालाही कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही किंवा वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. या घटनेच्या वेळी इतर कोणतेही वाहन आजूबाजूला नव्हते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. मात्र भरपावसात एवढ्या वेगाने कार चालवल्या प्रकरणी आशित शाह अडचणीत आले आहेत.

वरळी पोलिसांनी वाहनचालक आशित शाहांविरुद्ध कलम 281,125,324(4) बीएनएस आणि 184 मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नंतर ही अपघातग्रस्त कार टो करुन कोस्टल रोडवरुन बाजूला काढण्यात आली आणि वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.

अपघात रविवारी (21 सप्टेंबर 2025) सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईच्या कोस्टल रोडवर घडला. कार खांब क्रमांक 53 जवळ दुभाजकावर आदळली.कारचालक आशित शाह (52 वर्षे) दक्षिण मुंबईकडे जात असताना कारवरील नियंत्रण सुटले. पोलिसांच्या माहितीनुसार, कारचा वेग तासाला 100 किलोमीटर होता. सकाळची वेळ असल्याने इतर वाहनांना धडक टाळली गेली आणि वाहतुकीत अडथळा निर्माण झाला नाही.अपघातग्रस्त लॅम्बोर्गिनी कार आशित शाह (52वर्षे) चालवत होते. सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. हे अपघात पावसाळ्यातील भरपावसात झाले असल्याने ते अडचणीत सापडले आहेत.

वरळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला की, कारचा वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटले. इतर कोणतेही वाहन आजूबाजूला नव्हते, त्यामुळे कोणालाही इतर दुखापत झाली नाही. अपघाताची नोंद वरळी पोलिस ठाण्यात करण्यात आली.

हेही वाचा :

 लग्नाच्या पहिल्याच रात्री घडायचं असं काही की….
यंदाची दिवाळी धो धो पावसात जाणार! मान्सूनचा परतीचा प्रवास…
 Abhishek Sharma च्या दमदार खेळीनंतर बहिणचं रिएक्शन Viral