आता हॉटेलमध्ये जावं का? खिशावर महागाईचा दरोडा, व्यावसायिक गॅसने बिघडवले गणित

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.(pocket) हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महागाईचा स्फोट झाला आहे. भाजीपाल्यापासून ते इतर घटकांपर्यंत अनेक वस्तू महागल्या आहेत. त्यात आता गॅसही महागल्याने हॉटेल चालकांपुढे व्यावसायिक संकट उभे ठाकले आहे. त्याचा भार आता ग्राहकांवर पडणार आहे. हॉटेलच्या विविध पदार्थांमध्ये 10 ते 15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ग्राहकांचा खिसा चांगलाच कापल्या जाणार आहे. सर्वसामान्यांना आता हॉटेलिंगच नाही तर स्ट्रीट फूडची चवही कडू लागणार आहे. तर उद्योग संघटना आणि हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनांनी या दरवाढीला कडाडून विरोध केला आहे. यामुळे अगोदरच हवालदिल झालेले अनेक चालक उद्योग बंद करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर काहींनी आता इंधनाला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. पण हे पर्यायही महागडे असल्याने हॉटेल व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत.

फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (pocket)उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली. एलपीजीच्या दरवाढीमुळे आता खाद्यपदार्थांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. अन्नपदार्थांच्या किंमतीत 10 ते 15 टक्के वाढ निश्चित मानली जात आहे. पण तरीही चालकांच्या हाती फार काही लागणार नसल्याचे शे्टटी यांच्या म्हणणे आहे. केवळ हॉटेल व्यवसाय या वाढीने तग धरून असेल असे ते म्हणाले. 19 किलो वजनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत तीनदा एकूण 1,332.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यातील व्यत्यय, इतर पदार्थांची महागाई आणि ग्राहकांची संख्या रोडवली असताना आता अजून एक मोठे संकट हॉटेल व्यावसायिकांवर येऊन ठेपले आहे.

शेट्टी यांच्या मते, अनेक हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलची वेळ मर्यादीत केली आहे. (pocket)तर खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे. गॅसला पर्याय शोधला जात आहे. काहींनी थेट चूल पेटवली आहे. पण हे सर्व पर्याय वेळखाऊ आणि खर्चिक आहेतच. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. काहींनी तर हॉटेल व्यावसाय तात्पुरता बंद केला आहे. तर काहींनी उपजीविकेसाठी दुसरा मार्ग निवडला आहे. रोजगार कमी झाला आहे. अनेक कामगार बेघर झाले आहेत. या इंडस्ट्रीवर इतका मोठा आघात झाला असताना आता सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात येत आहे

शुक्रवारी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतीत 993 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळ चालक, स्ट्रीट फूड व्हेंडर्स, कॅटरर्स, बेकरी आणि क्लाउड किचनला बसला आहे. यातील काहींनी तर व्यवसायाला रामराम ठोकला आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3,071.50 रुपयांवर पोहचली आहे. गेल्या 6 महिन्यात 7 वेळा गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

 गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल