केंद्र सरकारने दिवाळीआधीच सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने जीएसटी(GST) करप्रणालीतील बदल केल्याने अनेक वस्तू स्वस्त होणार आहे. सोमवारी 23 सप्टेंबरपासून नवी जीएसटी करप्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नव्या जीएसटी कर प्रणालीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होणार असून दैनंदिन जीवनातील आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीही कमी होणार आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे आर्थिक खर्च वाचणार आहे.

कौटुंबिक किराणा आणि दैनंदिन खर्चात 13 टक्के बचत होणार आहे. याचबरोबर छोट्या मोटारीची खरेदी करताना सुमारे 70 हजार रुपये वाचतील. स्टेशनरी, कपडे. पादत्राणे आणि औषधांवरील जीएसटी कमी झाल्याने 7 ते 12 टक्के बचत होणार आहे. वैयक्तिक आरोग्य विमा आणि आयुर्विम्याला जीएसटीतून(GST) वगळण्यात आल्याने ही बचत 18 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते, असा सरकारचा अंदाज आहे.
जीएसटी सुधारणांमुळे 375 वस्तू स्वस्त झाल्या आहेत. त्यात किराणा वस्तू, कृषी उपकरणे, कपडे, औषधे आणि वाहनांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी कपातीला ‘जीएसटी बचत उत्सव’ असे नाव दिले आहे. आता 1800 सीसीपर्यंत इंजिन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरच्या खरेदीत 40 हजार रुपये वाचणार आहेत. आधी ट्रॅक्टरवरील जीएसटी 12 ते 18 टक्के होता. तो आता 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. याचबरोबर 350 सीसी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी आणि स्कूटरच्याखरेदीत 8 हजार रुपयांची बचत होईल. दूरचित्रवाणी संचाच्या (32 इंचावरील) खरेदीत 3 हजार 500 रुपयांची बचत होईल.
एसीच्या खरेदीवर 2,800 रुपयांपर्यंतची बचत होणार आहे. कारण या वस्तुंवर जीएसटीचा दर 28 टक्क्यांनी घटून 18 टक्के होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, जीएसटी दरांमधील कपातीनंतर आणि इनकम टॅक्स सूट दिल्यानंतर भारतीय कुटुंबीयांचा वर्षाला 2.5 लाख कोटींची बचत होणार आहे.
हेही वाचा :
‘स्विमसूट लुकमुळे साई पल्लवी चर्चेत; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी’
फोटो शेअर करत कतरिना कैफ आणि विक्की कौशलने दिली मोठी गुड न्यूज!
अखेर ठरलं! सौरव गांगुलीची पुन्हा अध्यक्षपदी नियुक्ती