डोंबिवली : डोंबिवलीत एका धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात(political articles) खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजपकडून सज्जड दम देण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कल्याण जिल्हा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मामा पगारे यांना भेटून त्यांना साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी थेट इशारा दिला, “यापुढे आमच्या वरिष्ठ नेत्यांची बदनामी केल्यास त्यांचीही अशीच अवस्था करु.” या घटनेमुळे डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले आहे.
स्थानिक राजकीय(political articles) तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची ठरू शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये पक्षीय तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.
राजकीय वर्तुळातल्या सूत्रांनी सांगितले की, डोंबिवलीत काँग्रेस नेत्यावर भाजपकडून झालेल्या तंबीमुळे स्थानिक निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, आणि दोन्ही पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
हेही वाचा :
पालकांना सावध करणारी बातमी! अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली अन्…
अपुरी झोप घेणाऱ्यांची भविष्यात ‘हा’ भयानक आजार पाहतोय वाट; धक्कादायक रिसर्च समोर!
शर्माची मिस्ट्री गर्लफ्रेंड चर्चेत! जाणून घ्या नेमकी कोण आहे ती?