भारत-पाकिस्तान सामन्यातील दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा प्रचंड चर्चेत आला. पण त्याच्या खेळाइतकंच आता त्याच्या कथित गर्लफ्रेंडचं(girlfriend) नावही चर्चेत आहे. सामना संपल्यानंतर तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सामन्यानंतरची खास स्टोरी :
21 सप्टेंबर रोजी दुबईत झालेल्या आशिया चषक 2025 मधील सामन्यात अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड(girlfriend) लैला फैसल हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले. या फोटोंसोबत तिने “नजर ना लगे…” असा इमोजीसह संदेश दिला. ही पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली.

अभिषेक आणि लैला हे दोघंही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहेत. याआधीही लैलाने अभिषेकच्या वाढदिवशी खास पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं. यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगू लागली आहे.

चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली :
लैलाने सामन्यानंतर केलेली स्टोरी पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्यांच्या नात्याची पुष्टी मानली, तर काहींनी ही फक्त मैत्री असल्याचं मत व्यक्त केलं. तरीदेखील, सोशल मीडियावरील या पोस्टमुळे ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अभिषेक शर्मा किंवा लैला फैसल यांनी आपल्या नातेसंबंधांबद्दल अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र, क्रिकेटरच्या यशानंतर तिच्या सातत्याने येणाऱ्या पोस्टमुळे दोघांमध्ये काहीतरी खास असल्याचा अंदाज लावला जात आहे.

हेही वाचा :

राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याच्या हालचालींना वेग…

सर्वोच्च न्यायालयाचं नेमकं म्हणणं काय? अल्पवयीन मुलीच्या…म्हणजे बलात्काराचा गुन्हा नव्हे…

गर्भवती महिलांसाठी पॅरासिटामॉल धोकादायक? ट्रम्प यांच्या दाव्यामुळे जागतिक तणावात वाढ