क्रिकेट(cricket) जगतामध्ये सध्या आशिया चषकाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे इतर देशांच्या क्रिकेट विश्वातूनही काही महत्त्वाची वृत्त समोर येत आहेत. अशाच एका वृत्तानं Cricket Lovers ना धक्का बसला आहे. कारण, वेगवान गोलंदाजीत पटाईत असणाऱ्या एका खेळाडूनं अवघ्या चार वर्षांच्याच क्रिकेट कारकिर्दीनंतर या खेळातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

निवृत्तीचा हा निर्णय घेतला आहे इंग्लंच्या महिला क्रिकेट(cricket) संघातील वेगवान गोलंदाज फ्रेया डेविस. वयाच्या 29 व्या वर्षी तिनं हा निर्णय घेतल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पुढील काळात फ्रेया वकिली क्षेत्रात आपली कारकिर्द पुढे नेऊ इच्छित असल्यानं तिनं हा निर्णय घेतला.

2019 ते 2023 दरम्यानच्या काळात ती इंग्लंडच्या महिला संघातून खेळली होती. मागील दोन वर्षे तिला आंततराष्ट्रीय संघात स्थान मिळू शकलं नाही, अनेक प्रयत्न करूनही तिच्या वाट्याला अपयश आलं. मात्र आता पुढं न खेळण्याचाच निर्णय तिनं घेतला आहे.

इथून पुढं फ्रेया कायदे क्षेत्रातील शिक्षण आणि कारकिर्द पुढे नेणार असून, या निर्णयासह तिच्या 15 वर्षांच्या सर्वोत्तम क्रिकेटच्या कामगिरीला आणि या प्रवासाला पूर्णविराम लागत आहे. डेविसनं 2019 मध्ये श्रीलंकेविरोधातील सामन्यात टी20 आंतरराष्ट्रीय चषकातून पदार्पण केलं होतं. 2023 मध्ये ती ऑस्ट्रेलिया संघाविरोधात ती अखेरची खेळताना दिसली होती.

इंग्लंड क्रिकेटच्या वतीनं एक अधिकृत माहितीपत्रक जारी करण्यात आलं. जिथं फ्रेयाच्या निवृत्तीची माहिती देण्यात आली. ‘फ्रेया डेविस यांना खुप साऱ्या शुभेच्छा. त्यांनी वकिलीसाठी क्रिकेट विश्वातून काढता पाय घेतला आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्या इंग्लंडसाठी 35 सामने खेळल्या. भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा’, असं इंग्लंड क्रिकेटनं म्हटलं

कायदा विषयातील अभिरुचीप्रती फ्रेयानं क्रिकेटकडे पाठ केली. तिनं कायद्याचा सराव कतेला असून, LLM चं शिक्षणही घेतलं आहे. त्यामुळं आता ही नवी इनिंग फ्रेयासाठी किती उत्साहपूर्ण ठरते हे पाहणं औत्सुक्याचं असेल. तिच्या या निर्णयाची माहिती मिळताच क्रिकेटप्रेमींनीसुद्धा फ्रेयाचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा :

फेस्टिव्हल सीझनमध्ये ५ नवीन SUV आणि Sedan दाखल होणार

पंतप्रधान मोदींचा ‘तो’ फोटो व्हायरल, काँग्रेस नेत्याला साडी नेसवली, भाजप आक्रमक

पालकांना सावध करणारी बातमी! अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली अन्…