मुंबई चेन्नईचा हिशोब करण्यासाठी सज्ज, 2 गुणांसाठी जोरदार चुरस, कोण जिंकणार?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 44 व्या सामन्यात चेन्नई (competition) सुपर किंग्स मुंबई इंडियन्स विरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना फार निर्णायक आणि महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना आपल्या शेवटच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तसेच चेन्नई आणि मुंबईची या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. चेन्नईने गेल्या लढतीत मुंबई इंडियन्सवर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबईचा गेल्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवाचा हिशोब करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता मुंबई यशस्वी ठरणार की चेन्नई पुन्हा मैदान मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. (competition)मात्र 19 व्या मोसमात दोन्ही संघांची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. चेन्नईची मुंबईच्या तुलनेत ठिकठाक कामगिरी राहिली आहे. मुंबईला 8 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. मुंबईने या मोहिमेत 2012 नंतर पहिल्यांदा आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. मात्र त्यानंतर मुंबईला सलग 4 पराभवानंतर दुसऱ्या विजयाची चव चाखता आली. त्यानंतर मुंबईने सलग 2 सामने गमावले. मुंबई ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे.

तर चेन्नई सुपर किंग्स कामगिरीत सातत्य ठेवण्यात अपयशी ठरलीय. (competition)चेन्नईची सलग 3 पराभवांसह सुरुवात झाली. मात्र त्यानंतर चेन्नईने दमदार कमबॅक करत सलग 2 सामने जिंकले. चेन्नईचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर चेन्नईने इतिहास घडवला. चेन्नईने 23 एप्रिलला मुंबईला वानखेडे स्टेडियममध्ये 103 धावांनी पराभूत केलं. चेन्नईचा हा धावांबाबत सर्वात मोठा विजय तर मुंबईचा सर्वात मोठा पराभव ठरला. चेन्नई मुंबईला 100 आणि त्यापेक्षा अधिक धावांनी पराभूत करणारी पहिलीच टीम ठरली.

त्यामुळे या हंगामातील दुसऱ्या एल क्लासिको सामन्यात कोण यशस्वी ठरतो यासाठी निकालाची प्रतिक्षा पाहावी लागणार आहे.दरम्यान उभयसंघात आतापर्यंत एकूण 40 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने त्यापैकी सर्वाधिक 21 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईने 19 सामन्यांत मुंबईला पराभूत केलं आहे. अशात आता 41 व्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

 गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल