महाराष्ट्र काँग्रेसमध्ये(Congress) पहिल्यांदाच लक्षेवधी बदल पहायला मिळाला आहे. मुंबई युवक काँग्रेसला पहिली महिला अध्यक्ष मिळाली आहे. झीनत शबरीन यांनी नुकत्याच झालेल्या संघटनात्मक निवडणुकीत 10,076 मते मिळवून विजय मिळवला. त्यामुळे हे पदावर पहिल्यांदाच एका महिला सदस्याची नियुक्ती झाली आहे.

संघटनेच्या नुकत्याच झालेल्या अंतर्गत निवडणुकीत झीनत शबरीन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी सर्वाधिक 10,076 मते मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला आणि त्यांच्या आठ इतर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. काँग्रेस युवा शाखेतील पदाधिकाऱ्यांसाठी 16 मे ते 17 जून दरम्यान निवडणुका झाल्या. अध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात होते. रविवारी निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये झीनत शबरीन विजयी झाल्या. सोमवारी काँग्रेस पक्षाने त्यांच्या विजयाची घोषणा केली.

शबरीन यांचे व्यक्तिमत्व खूपच वेगळे आहे. झीनत या राजकीय कुटुंबातून येत नाहीत. विजयानंतर त्यांनी सांगितले की, मुंबई युवक काँग्रेसला(Congress) मुंबईच्या तरुणांचा आवाज बनवण्यासाठी त्या काम करतील. भारतीय युवक काँग्रेसने मला, जो एका गैर-राजकीय पार्श्वभूमीतून येतो, त्याला इतके मोठे व्यासपीठ दिले आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुंबई काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस आणि मुंबई युवक काँग्रेस कुटुंबाची आभारी आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आयवायसीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या नेतृत्वाखाली संघटना लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढत राहील. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ती सतत प्रयत्न करेल असं शबरीन म्हणाल्या. मुंबईतील तरुणांशी संबंधित मुद्दे उपस्थित करणे हे त्यांचे प्राधान्य असेल. शहरातील तरुणांना भेडसावणाऱ्या रोजगार, शिक्षण आणि इतर आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याचा त्यांचा मानस आहे. तरुणांचा आवाज सक्षम करणे हे त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. झीनत शबरीन यांच्या विजयामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

हेही वाचा :

फेस्टिव्हल सीझनमध्ये ५ नवीन SUV आणि Sedan दाखल होणार

क्रिकेटला अलविदा; वेगवान गोलंदाज खेळाडूच्या निर्णयानं क्रिकेट जगत हैराण!

वाहतुक कोंडी कायमची सुटणार? अजित पवार सर्वात मोठा निर्णय घेणार