बॉलीवूडमध्ये प्रेम आणि कुतूहल या दोन्ही गोष्टींचा नियमित संगम असतो, आणि चर्चेचा विषय ठरतो. याच पार्श्वभूमीवर अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ(actress) यांच्याबाबत असलेल्या चाहत्यांच्या उत्सुकतेला अखेर उत्तर मिळाले. या दोघांनी नुकतीच त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गोड आणि आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या आयुष्यात गोड बातमी आहे की नाही, या चर्चेने जोर धरला होता. मात्र, आज विकी आणि कतरिना यांनी स्वतः चाहत्यांसोबत ही खुशखबर शेअर करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी कतरिनाचा बेबी बंप दिसणारा फोटो शेअर केला आहे. हा एक पोलॅरॉइड फोटो असून त्यात विकी कतरिनाच्या बंप वर हात ठेवून पोज देताना दिसत आहे, हे दृश्य त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत गोड आणि आनंददायक ठरले आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ(actress) यांनी या खास क्षणासाठी एक सुंदर कॅप्शन दिलं आहे, ज्यात त्यांनी लिहिलं आहे की, “आमचं मन आनंदी आणि कृतज्ञतेने भरलं आहे. या आनंदी अंतः करणासह आम्ही आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू करतोय”. या पोस्टवर लाईक आणि कमेंट्स चा वर्षाव करत चाहते या दोघांच्या आनंदात सहभागी झाले आहेत.

याआधीही, अलिबागला जाताना विकी-कतरिनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात कतरिनाचा बेबी बंप दिसून आला होता. त्यानंतर या गुड न्यूज ची अपेक्षा चाहत्यांमध्ये अजूनच वाढली होती. पण याबाबत या दोघांनीही काही स्पष्टीकरण दिलं नव्हतं.

बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या स्पेशल प्रीमियरसाठी विकी एकटाच उपस्थित होता. त्यावेळेस सुद्धा प्रेक्षकांच्या मनात कुणकुण लागली होती. २०२४ मध्ये कतरिना कैफ चा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यानंतर वर्षभरात ती कुठेही झळकली नाही, पण विकी कौशल चा ‘छावा’ सिनेमा जोरदार गाजला होता. आता या दोघांच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय त्यांच्या चाहत्यांसाठीही अत्यंत खास ठरला आहे.

हेही वाचा :

फेस्टिव्हल सीझनमध्ये ५ नवीन SUV आणि Sedan दाखल होणार

क्रिकेटला अलविदा; वेगवान गोलंदाज खेळाडूच्या निर्णयानं क्रिकेट जगत हैराण!

वाहतुक कोंडी कायमची सुटणार? अजित पवार सर्वात मोठा निर्णय घेणार