केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत हालचालींना वेग आला (good news) असून, वेतन संरचना, महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदलांचा थेट फायदा लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार असल्याचे मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन सध्याच्या १८ हजार रुपयांवरून तब्बल ५१ हजार ४८० रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या सुधारणांचा परिणाम सुमारे ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांवर होणार आहे.
नवीन वेतन आयोगामुळे केवळ पगारवाढच नाही, तर महागाई भत्त्याच्या गणनेतही बदल अपेक्षित आहेत. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार वाढेलच, शिवाय निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि इतर लाभही वाढतील. त्यामुळे सरकारी सेवेत कार्यरत आणि निवृत्त दोन्ही वर्गासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
आठव्या वेतन आयोगाची अधिकृत अधिसूचना १७ जानेवारी २०२५ रोजी जारी करण्यात आली होती. नव्या वेतन संरचनेची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ पासून होण्याची अपेक्षा आहे. आयोग २०२७ च्या मध्यापर्यंत अंतिम शिफारसी सादर करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मागील वेतन आयोगांचा इतिहास पाहता, स्थापना ते अंमलबजावणी या प्रक्रियेला साधारण दोन ते साडेतीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वाढीव वेतन आणि थकबाकीचा लाभ २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ मध्ये मिळू शकतो. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष आता आठव्या वेतन आयोगाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?