नवरात्राच्या तोंडावर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा (Rain)इशारा दिला आहे. रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अद्याप अनेक भागांत सुरू असून, पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अरबी समुद्र व दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम मराठवाड्यावर होणार असून, मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस(Rain) सुरू असून, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मात्र मुसळधार पावसाचा धोका कायम आहे.
हवामान विभागाने नाशिक, अहिल्यानगर, घाटमाथा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, हिंगोली, नागपूर, नंदूरबार आणि वर्धा या दहा जिल्ह्यांसाठी जोरदार ते अतिवृष्टीसमान पावसाचा इशारा दिला आहे. विजांचा कडकडाट, गडगडाट आणि ताशी 40 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे तसेच शेतकऱ्यांनी पिकांची विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. खरं तर 15 सप्टेंबरपासून मान्सून परतीच्या टप्प्यात जायला हवा होता, पण कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वाढली आहे.
या अनियमित हवामानामुळे नवरात्र काळातही पावसाचा प्रभाव राहणार आहे. स्कायमेट व आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांच्या अहवालानुसार यावर्षी ‘ला नीना’चा परिणाम भारतात जाणवणार असून, त्यामुळे अतिथंडी व अति उष्णतेचे प्रमाण वाढेल.
मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता कायम राहील. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल. मात्र, सध्या राज्यात कधी मुसळधार, तर कधी रिमझिम पावसाची स्थिती दिसून येत आहे.
हेही वाचा :
ORS प्यायल्यामुळे खरचं शरीरातील थकवा कमी होतो का? जाणून घ्या
पुढील 24 तासांत बनणार नवे रेकॉर्ड; ‘महावतार नरसिम्हा’ची आता ओटीटीवर डरकाळी
सूर्यग्रहणाच्या दिवशी ‘या’ गोष्टी गरोदर महिलांनी करू नये,