उन्हाळ्यात जास्त घाम, उष्माघात, उलट्या किंवा जुलाब यामुळे शरीरातील पाणी आणि खनिजे झपाट्याने कमी होतात. अशा वेळी डिहायड्रेशनची समस्या गंभीर होऊ शकते. यावर सहज उपलब्ध आणि प्रभावी उपाय म्हणजे ओआरएस(ORS) (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन).

ओआरएस(ORS) हे औषध नसून मीठ, साखर आणि इलेक्ट्रोलाइट्सचे मिश्रण आहे. हे शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करते आणि सौम्य अतिसार किंवा उलट्या झाल्यास फक्त ओआरएस पुरेसे ठरते. लहान मुले आणि वृद्धांमध्येही याचा वापर सुरक्षित मानला जातो.

तज्ज्ञांच्या मते, सौम्य प्रकरणांमध्ये औषध घेण्याची गरज नसते. मात्र, जर अतिसार किंवा उलट्या थांबत नसतील, पोटदुखी कायम राहत असेल, रक्तस्राव होत असेल किंवा तीव्र अशक्तपणा जाणवत असेल, तर केवळ ओआरएस उपयोगी ठरत नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डॉक्टरांची शिफारस असलेली औषधे :

बॅक्टेरियल संसर्ग असल्यासच प्रतिजैविक (अँटीबायोटिक्स) दिली जातात.

आतडे बळकट करण्यासाठी प्रोबायोटिक्स बहुतेकदा ओआरएससोबत वापरले जातात.

उलटीविरोधी किंवा तापाची औषधे डॉक्टर सांगतील तेव्हाच घ्यावीत.

ओआरएस वापरताना घ्यावयाची काळजी :

पॅकेजवरील सूचनांचे काटेकोर पालन करा.

द्रावण बनवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.

ओआरएस नेहमी उकळून थंड केलेल्या पाण्यातच मिसळा.

अतिरिक्त साखर, रस किंवा थंड पेये यात मिसळू नका.

तयार द्रावण २४ तासांपेक्षा जास्त साठवू नये.

तज्ज्ञ सांगतात की, सौम्य डिहायड्रेशनमध्ये ओआरएस हा जलद आणि सुरक्षित उपाय आहे. मात्र स्थिती गंभीर झाल्यास विलंब न करता त्वरित वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर;
Work from home करणाऱ्यांना करात सूट कशी मिळेल?
Dashavatar सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्याकडून खंत व्यक्त म्हणाला,