मोठी बातमी! सिलिंडरचे बुकिंग ते डिलिव्हरीपर्यंत नियम बदलणार, किंमतीही वाढण्याची शक्यता

देशभरातील एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मे महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (LPG gas) बुकिंगपासून डिलिव्हरीपर्यंतच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येणार असून ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि पारदर्शक सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

नवीन नियमांनुसार गॅस सिलिंडरची डिलिव्हरी आता ओटीपी आधारित करण्यात येणार आहे. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल आणि तो डिलिव्हरी एजंटला दिल्यानंतरच सिलिंडर सुपूर्द करण्यात येईल. यामुळे चुकीच्या व्यक्तीकडे सिलिंडर जाण्याची शक्यता कमी होणार आहे.

बुकिंगच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. शहरी भागातील ग्राहकांना बुकिंगनंतर सिलिंडरसाठी सुमारे २५ दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते, तर ग्रामीण भागात हा कालावधी ४५ दिवसांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी गॅसचा वापर नियोजनपूर्वक करण्याचा सल्ला दिला जात आहे.

एलपीजी सुविधेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. आधारशी लिंक असलेली ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच ग्राहकांना सबसिडी आणि इतर सुविधा मिळतील. ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, मे महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि इंधन बाजारातील चढउतार यामुळे सिलिंडरचे दर वाढू शकतात. काही अहवालांनुसार किंमतीत ६० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
सरकारकडून एलपीजीऐवजी पीएनजी गॅस वापरण्यालाही प्रोत्साहन दिले जात आहे. पीएनजी कनेक्शन घेतल्यास काही ठिकाणी विशेष ऑफर्सही दिल्या जात असल्याची माहिती आहे.

याशिवाय गॅस सिलिंडर बुकिंगची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. ग्राहक आता व्हॉट्सअॅप, एसएमएस, मिस्ड कॉल, आयव्हीआरएस, मोबाईल अॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून बुकिंग करू शकतात. मात्र, बुकिंगसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरणे आवश्यक राहणार आहे.

हेही वाचा

अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ‌?.

पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…

‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल