येत्या नवरात्रीत जर तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर (Yamaha)खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग Yamaha ने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

महाराष्ट्रात नवरात्रीचे औचित्य साधून (Yamaha)उत्सवाचा रंगतदार आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीची आराधना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सजवलेल्या दांडियाच्या रात्रभर चालणाऱ्या रंगतदार जल्लोषाच्या तयारीत राज्यातील नागरिक मग्न झाले आहेत. अशा आनंदोत्सवी वातावरणात ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी इंडिया यामाहा मोटरने महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी खास नवरात्री ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
या शुभ प्रसंगी Yamaha ने त्यांच्या लोकप्रिय बाईक आणि स्कूटर्सवर जीएसटी फायदे, विमा ऑफर्स आणि कॅशबॅक यांचा आकर्षक मेळ साधला आहे. यामुळे या नवरात्रीत तुमच्या पसंतीची यामाहा दुचाकी घरी आणण्यासाठी हा सर्वोत्तम काळ ठरणार आहे.
यामाहा नवरात्री स्पेशल ऑफर्स
R15 V4: तब्बल 15,734 रुपयांपर्यंतचा जीएसटी फायदा आणि 6,560 रुपयांचा विमा फायदा.
MT-15: जवळपास 14,964 रुपयांपर्यंतचा जीएसटी फायदा आणि 6,560 रुपयांचा विमा फायदा.
FZ-S Fi Hybrid: 12,031 रुपयांपर्यंतचा जीएसटी फायदा आणि 6,501 रुपयांचा विमा फायदा.
Fascino 125 Hybrid: जवळपास 8,509 रुपयांपर्यंतचा जीएसटी फायदा आणि 5,401 रुपयांचा विमा फायदा.
RayZR 125 Fi: 7,759 रुपयांपर्यंतचा जीएसटी फायदा आणि 3,799 रुपयांचा विमा फायदा.
या आकर्षक ऑफर्समुळे यामाहाची प्रीमियम श्रेणीतील बाईक्स आणि स्कूटर्स आणखी किफायतशीर दरात उपलब्ध होत आहेत. अत्याधुनिक डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या दुचाक्या प्रत्येक राइडला अधिक रोमांचक आणि खास बनवतात.
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
यामाहाची R15 V4 ही बाईक तिच्या रेसिंग डीएनएसाठी तर MT-15 दमदार स्ट्रीट परफॉर्मन्ससाठी लोकप्रिय आहे. FZ-S Fi Hybrid तरुणांसाठी आकर्षक पर्याय ठरत असून, Fascino 125 Hybrid आणि RayZR 125 Fi हे स्कूटर्स स्टाईल, परफॉर्मन्स आणि कार्यक्षमतेचा संगम घडवतात. या सर्व मॉडेल्सवर सध्या उपलब्ध असलेल्या ऑफर्स ग्राहकांसाठी नवरात्रीत खऱ्या अर्थाने ‘वॅल्यू फॉर मनी’ ठरत आहेत.
या नवरात्रीत महाराष्ट्रातील जवळच्या यामाहा डिलरशिपला भेट द्या आणि या आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊन तुमची आवडती बाईक किंवा स्कूटर घरी आणा.
हेही वाचा :
मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर
राज आणि उद्धव यांची युती झाली तर? शरद पवार स्पष्टच बोलले
शाहरुखने ‘या’ चित्रपटात कॅमेऱ्यासमोर दिलेला न्यूड सीन, इंटीमेट सीनंतर झाली होती अटक